'सत्य म'ला उमगले!

'सत्य म'ला उमगले आणि फुटला भ्रमाचा फुगा
किती मिरवला आयटीचा रंगीत पण आखूड झगा

कोटीच्या कोटी उड्डाणे उगीच दाखविली जगा
सत्य कळले तेव्हा सत्य सगळ्यांना डसले बघा

रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा
ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा

नशीब पेपर सेट करतयं, म्हणतयं "आता भोगा"
आऊट ऑफ सिलॅबस आहे पेपर, नशीबच देतयं दगा

आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा
पिझ्झा? अरे 'हट!', पोटापोटात घाली आता थालपीठ पिंगा

पॉलीस्यांचे पट्टे बांधून कंपन्या म्हणतायत "कुत्र्यासारखं जगा"
नुसतं हुंगायला देखील आता कुठेच शिल्लक नाही जागा

एंट्री करा, 'घाईत' असतांना मी, गुरगुरला गार्ड मघा
कडक पॉलीस्यांचा असा चालला आहे नाच आसुरी नंगा

लेऑफची भीती जणू सांगतेय की आता उकीरडे हुंगा
छोड ना यार टेंशन, डरना कायकू, जो होंगा सो होंगा!!

-- समीर