अपूर्ण या जगात...!

अपूर्ण या जगात,

सारेच रे अधुरे!

परिपूर्ण काही नाही,

जाणून सर्व घे रे!

या वाहत्या नदीत,

पाणी अपार आहे!

काठावरी परंतु,

कोणी तृषार्त राहे!

रविराज हा नभीचा,

उधळी प्रकाश सारा!

कोठे कुणी परी ते,

 अंधत्व साहताहे!

तारुण्य वैभवाला,

'जरा' शाप येथे,

उमलत्या कळ्यांचे

निर्माल्य नित्य होते!

मज ओढ पूर्णतेची,

ही छान गोष्ट आहे!

परी जाण अपूर्णतेची,

सौख्यास नित्य बाहे!