आमची प्रेरणा आनिरुद्ध अभ्यंकरांची कविता ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...
चेहरा सारेच खोटे सांगतो
याचसाठी आरसा तुज दावतो
मज तडी पडणार अंती जाणतो
मी तरी मेसेज 'तसले' धाडतो
कोंबले मी पोट टीशर्टामध्ये
फुंकरीने फुगवल्यागत वाटतो
यायची असतेस तेव्हा का मला
काळ हा येणार आता वाटतो
एवढी साधी नसावी भेळ ती!
पचवण्याला वेळ आहे लागतो
तो अता हल्ली खुळ्या गत सारखा
मी कसा भारी जगाला सांगतो
हे तसे माझेच आहे काव्य पण
मी विडंबन धर्म माझा पाळतो
जालरानावर पुन्हा "केश्या" अता
नव कवींची वाट आहे पाहतो
-केशवसुमार