सोबतीला पाव आहे

आमची प्रेरणा जयंतरावांची सुंदर गझल सोबतीचा आव आहे आणि आमच्या गुरुजींचे दर्जेदार विडंबन (सोबतीचा आव आहे)

वाढला सांबार आहे, ब्रॉथ नाही
सोबतीला पाव आहे, भात नाही

भोवती अंधार आहे, रात नाही
चुंबिला तो पाय आहे, हात नाही

वाटतो हा  खेळ पण ना फार सोपा
राहिले तोंडात बाकी दात नाही

घासतो  मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही

कां बरे त्यांची घरे ही साफ दिसती?
गावभर करती उकिर्डा, आत नाही ;)

सोडल्यावर तो म्हणाला, काल वायू
फक्ता हा आवाज आहे, वात नाही.

हा विडंबन पाडण्या  तैयार असतो
खोड "केश्या" ची कशी ही जात नाही

(केशवसुमार)