मृत्युचिन्ह

प्रिय मृत्यो,

नश्वर जगातल्या एकमेव खऱ्या मित्रा,

लोक तुला काय काय म्हणतात ....

आयुष्य थांबवतोस म्हणून      पूर्णविराम .

पुनर्जन्माच्या संकल्पनेनुसार   अर्धविराम ;

नंतर येणाऱ्या अनेक जन्मांतला एक संपला म्हणून    स्वल्पविराम  ,

पुढल्या जन्मास जोडणारा म्हणून    संयोगचिन्ह   -

अर्ध्यातूनच उठवलंस तर    अपसारणचिन्ह   ---

विशेष असलास तर    'एकेरी अवतरणात'

अतिविशेष असलास तर   "दुहेरी"

जगातलं

 न थांबलेलं आश्चर्य      उद्बारचिन्ह   !

अन न सुटणारं कोडं :   प्रश्नचिन्ह  ?