झटपट आप्पे.

  • रवा इडली पाकिट-गीटस चेच घ्यावे. (दुसऱ्या कोणाचे घेतल्यास छान होत नाहीत. तसेच नुसते इडली अथवा डोसा घेतल्यास ही चांगले होत नाहीत.)
  • एक मध्यम कांदा बारीक चिरावा.
  • दोन/तीन हिरव्या मिरच्या बारीक चिराव्यात.
  • दहा/बारा कडिपत्त्याची पाने तुकडे करून घ्यावीत.
  • एक इंच आले किसून घ्यावे.
  • काजू तुकडे करून घ्यावेत. ( नाही घातले तरी चालतात. )
  • तीन चमचे तेल.
  • तिनशेदहा मिली लीटर पाणी.
२० मिनिटे
तीन जनांणा पुरतात.

एका पातेल्यात रवा इडली चे पाकिट ओतावे. त्यात कांदा, मिरच्या, आले, कडिपत्ता, काजू आणि पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून दहा/बारा मिनीटे ठेवावे. गॅसवर आप्पे पात्र ठेवावे. प्रत्येक खळग्यात तिनचार थेंब तेल घालावे. (तेवढे तेल पुरते. ) पात्र नीट गरम झाले की एक चमचा मिश्रण प्रत्येक खळग्यात ओतावे. झाकण ठेवावे.आंच मध्यम असू द्यावी. चार मिनीटांनी झाकण काढून आप्पे उलटावे.सोनेरी रंग येतो. उलट्यावर झाकण ठेवू नये. चार-पाच मिनीटांनी काढावेत. गरम गरम चटणी बरोबर वाढावेत.

हे आप्पे आयत्या वेळी ठरवून हि करता येतात आणि चवदार लागतात. कमीत कमी तेल लागते. संध्याकाळी गरम गरम खावेसे वाटते त्या साठी योग्य आणि झटपट होतात.

आई