सासु आणि सुन यांच्या नात्यात बदल हवेत का?

आजच जग हे स्पर्धेच आहे. आणि या जगात पुरुषांप्रमाणे स्त्रियाही अर्थाजनासाठी बाहेर नोकरी करतात आणि घरही सांभाळतात. ह्या बदलत्या जगात सासु-सुनेचे नातेदेखिल बदलणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे सुनेला सासुचा सपोर्ट हवा आहे तसाच सासुलादेखिल सुनेकडून काही अपेक्षा आहे. हा विषय प्रत्येक घरातील आहे, पण या नात्यात बदल होण्यासाठी काही मुद्द्यांवर खुल्या मनाने चर्चा व्हावी असे वाटले.

१. सासू सुनेला खरच मुलगी मानते का?

२. दोघींमधिल गैरसमज कमी करण्याकरीता काय करता येइल?

३. नवऱ्याची आणि सासऱ्याची भुमिका महत्त्वाची असते का ?

४. सासू आणि सुनेने एकमेकांचे विश्व समजुन घेण्याची गरज आहे का ?

५. सासू आणि सुनेने आपल्या सोयीनुसार वेगळे घर करणे गरजेचे आहे का ?

६. "सुनेने जसं सासुच मन जिंकावं तसच सासुनेही सुनेचं मन जिंकावं " हा नवीन युगातिल नवीन नियम काढला तर काय होइल ?