तो बेत कालचा मुळीच ठरला नव्हता

आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता

तो बेत कालचा  मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी पण पेला भरला नव्हता

मी घरी कशी जाण्याची  हिंमत केली?
मी  रस्ता घरचा कसा विसरला नव्हता

एवढी कुठे मी काल ढोसली होती?
हैंगओवर हा अजून  उतरला नव्हता

शेवटी घेतली कॉफी मी या करता
उताऱ्यास  घरी घोट ही उरला नव्हता

एवढा कधी मी टल्ली नव्हतो किंवा
एवढा कधी पण पाय घसरला नव्हता

दिवसात अमुचे कलत्र बिघडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

एवढ्यात काही "केश्या" लिहिले नाही
एवढ्यात कुणी कवी भादरला नव्हता

केशवसुमार