फार खेचाखेच सहते शेपटी

आमची प्रेरणा भूषणरावांची गझल बोलणे त्याचे मनापासून ते.........

ते म्हणाले फार मोठी शेपटी!
लाकडामध्ये अडकली शेपटी !!

चवळीच्या शेंगेपरी नाजूकशी,
पण शेवटी 'तसलीच' झाली शेपटी!

आग लावूनि शेवटी थंडावली
लंकेमध्ये विध्वंस करुनी शेपटी

माकडिणीच्या दिलाला त्रास का?
(काय सांगू एक कारण, शेपटी!)

थोडीशी तू, बाजूला ओढून घे
फार खेचाखेच सहते शेपटी

माकडांना नाव ज्यांनी ठेविले
शेवटी त्यांनाही आली शेपटी!

करुनिया खोटे खऱ्याच्यासारखे
मिरवतो लावून खोटी शेपटी!

वाटले राहील ते माकड सदा
पण, खेचराला 'गाढवा'1ची शेपटी!

- आजानुकर्ण (ऊर्फ गाढव)
1. तखल्लुसाचा प्रयोग कसा वाटला? :)