तुटक..तुटक

जसा जगतो
तसा लिहतो
दोन्ही सारखे..तुटक..तुटक

कुठे जायचे
ठरत नाही
पायी नुसती..भटक..भटक

पडे ना कधी
थेंब खरा
लागे मृगजळाची..चटक..चटक

तो त्रिशंकू
आणि मी
दोघा नशिबी... लटक..लटक

कोण येते?
कोण जाते?
कानी चपलांची..फटक..फटक

(जयन्ता५२)