लिहून काय साधले

आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल  जगून काय साधले

लिहून काय साधले विचारतोस केशवा
(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")

जरा कुठे लिहायला तजेलदार लागले
धुण्यापरी तरी  कशास बडवतोस केशवा

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा

अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा

नको अम्हास हे तुझे लिखाण रोज कोडगे
अता हवा तुझ्यावरी उपाय ठोस केशवा

सुमार लेखकाहुनी सुमार वाटतोस तू
नवी उमेद ही कुठून आणतोस केशवा

कटेल का खरेच ह्या स्थळावरील ब्याद ही
किती अजून द्यायचे कळे न  ढोस केशवा