ह्यासोबत
आता सगळी मुले स्वप्नीलला उघड उघड चिडवायला लागली होती. आजूबाजूचा सर्व लोकांना कळले होते लोक त्याला बोलावयाचे मजा करू म्हणून सगळे त्याची थट्टा मस्करी करायचे. एक दिवस मी खोलीतच पेपर वाचत बसलो होतो तो म्हणाला मला तुला काही दाखवायचं आहे मी म्हणालो काय? तर त्याने मला एक फोटो दाखवला त्यामध्ये एक मुलगा स्वप्नीलच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता पण त्याफोटो मध्ये स्वप्नीलने साडी घातली होती मी तो फोटो पाहून नखशिखान्त हादरलो माझा माझ्यावरचा ताबा सुटला मी त्याला नाही नाही ते बोललो म्हणालो तुम्हाला आई बाप ह्या गोष्टीं साठी बाहेर शिकायला पाठवतात का तुझी लायकीच ती आहे आणखी बरच काही शेवटी मी त्याला म्हणालो मला तुझ्या त्या जगाशी काही घेणं देणं नाही तू त्या मुलांना परत जर खोलीवर आणलेस तर माझ्याशी गाठ आहे तुझा माझा काही संबंध नाही.मला नंतर कळले की ती माझी खूप मोठी चूक होती मी त्याला तसे बोलायला नको होते पण मी कोणी मानसोपचारतज्ञ नव्हतो का कुणी डॉक्टर नव्हतो मी आपल्यापरीने त्या परिस्थितीला रीअएक्ट झालो होतो कदाचित त्याला माझा धाक असावा व त्याला अजूनही आपण सामान्य आयुष्य जगू शकतो ही आशा असावी म्हणून त्याने माझे रागावणे मनावर घेतले नाही. तो मला खूप मानायचा माझी कामे करताना त्याला खूप आनंदव्हायचा. मी परत त्याला समजावयाला सुरुवात केली मी त्याला म्हणालो आता तुला बदलण्याची जबाबदारी माझी, मी एका मिशन प्रमाणे त्याला सुधारण्याच्या कामात लागलो त्याला म्हणालो आधी तू मिशी ठेव आणि जीम लाव चांगली बॉडी झाली की तुझा न्यूनगंड कमी होईल तू चांगले जेवण घेत जा आणि ध्यान करणे सुरू कर. तो पण ह्या गोष्टी मन लावून करण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवस आनंदात जायचे आम्ही चहा प्यायला जायचो बाजारात जायचो गाणी ऐकायचो असेच काही दिवस गेले की त्याच गणित बिघडायचं, गाण्याच्या कॅसेट तोडून टाकायचा खूप वेडंवाकडं बरळायचा मी त्याला एकदोनदा मानसोपचारतज्ञाकडे घेऊन गेलो त्याची ट्रिटमेंट चालू होती पण अलीकडे तो खूप निराश वाटायला लागला त्याने कॉलेज पुर्णपणे सोडून दिले. आता तो पुर्णपणे त्या मुलांच्या आहारी गेला होता.मध्ये माझे काही पैसे चोरीला गेले मी तेव्हढे लक्ष नाही दिले माझे कपडे पण चोरीला जाऊ लागले नंतर मला समजले ते कोण करत होत. मी स्वप्नीलला म्हणालो तू खूप दूर गेला आहेस मित्रा मी काही तुला आयुष्यभर पुरणार नाही तुला ही लढाई एकट्यानेच लढावी लागणार. एकदा माझ्याशी तो खूप विचित्र वागला त्याची स्पर्श करण्याची पद्धत मला खूप वेगळी वाटली मी म्हणालो मी काही तुझ्या दुनियेतल्या मुलांप्रमाणे नाही आहे रे. त्या दिवसापासून मी त्याच्यापासून दूर जाऊ लागलो मला आता माझी वाट शोधणे क्रमप्राप्त होते. मी दुसरीकडे राहायला गेलो तिकडे पण तो अधुनमधुन यायचा त्याला असुरक्षित वाटले की तो यायचा पण मी त्याला टाळू लागलो हे त्याला कळून चुकले. मी जर त्याच्या पासून दूर गेलो तर त्याला आपण काय गमावले आहे ह्याची त्याला जाणीव होईल व तो सुधारेल ही माफक आशा मला होती.पुढे त्याचा संपर्क मी पुर्णपणे तोडला अशी बरीच वर्षे निघून गेली एक दिवस त्याचा फोन आला तो खूप कळवळीने बोलत होता तो म्हणाला तू गेल्यानंतर मला समजले मी काय गमवले आहे ते त्यावेळी मी ठरवले की ह्या नरकातून मी तुला बाहेर पडुनच दाखवीन मला तुला दाखवायचे होते मी ह्यातून बाहेर पडू शकतो मी आता खूप बदललो आहे आता मी जीम लावली आहे मिशी पण आहे आत माझा त्या मुलांशी काहीही संबंध नाही मी आता आई वडीलां बरोबर राहतो ते आता माझी काळजी घेतात त्यांना पण आता सगळे समजले आहे मी कॉलसेंटर मध्ये काम करतो शिक्षण सोडले आता शिक्षणाचे खरे महत्त्व कळले पण आता खूप पुढे निघून गेलोय तुझ्यामुळे मला जीवनदान मिळाले तू माझ्यासाठी काय आहेस हे मी सांगू शकत नाही वगैरे मी म्हणालो मित्रा तू ह्यातून बाहेर पडलास हेच माझ्यासाठी खूप आहे. मी त्याला माझ्या लग्नाला बोलावले नव्हते पण माझ्या मुलीच्या बारश्याला त्याला बोलावले तो तिच्यासाठी छान खेळणी आणि दुपटं घेऊन आला. मी आता अमेरिकेत असलो तरी त्याच्या संपर्कात आहे नेहमी तो माझी आठवण काढून गहिवरतो एका निरागस जीवाला वाचवल्याचा मला आनंद आहे पण सगळे स्वप्नील तेवढे नशीबवान असतात का?