(अशक्य केवळ)

सहज शक्य असा अशक्य केवळ (www.manogat.com/node/16108) हा फ्री - हिट आणि त्यातही फुलटॉस भल्या-भल्यांनी सोडला. असा चेंडू भल्या-भल्यांनी सोडणे हे फारसे रुचले नाही. अगदी षट्कार नाही; पण एक-दोन धावांचा फटका तरी मारावा म्हटलं...

तुझाच उरला विचार केवळ
'विसर' आता अशक्य केवळ

कसे करावे तुजला राजी,
बोलतेस तू तशीही फटकळ

अशात व्हावी फितूर गात्रे
(निभाव आता अशक्य केवळ)

'पिऊन' येता पुन्हा घराशी
दिसते मजला का हे उखळ?

बारची ही तुंबली उधारी
हिशेब उरले तुझेच केवळ

हा दुवा देणे महत्कठीण कर्म आहे. तो कॉपी पेस्ट करून दिला तर ते रोमन अक्षरांचं लचांड. किती पेडांटिक असावं तरी या संकेतस्थळांनी. काही मर्यादा? असो. आता ही मराठी खोगीरभरती कामी यावी.