वैरिण

कुणी बाला समोर दिसली

अंगावरून दरवळत गेली

कानशिले गरम झाली

वर्तमाना भूल पडली ...

मागे वळून पाहातो तर

चप्पल जागी झाली

अंगठा तोडून घेत तिने

भूमी मजला दाविली...

ती बाला परत धावली

चुकचुकली हळहळली

भग्न चष्मा हाती देऊनी

बसते केले मजसी...

 अन दिला अनाहुत सल्लाही

काका सांभाळा स्वतःला!...

माझे चपलेवर चरफडणे-

कां गं वैरिण झालीस तूं ???