(म्हणू नका रे....)

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर रचना म्हणू नका रे....

भेटून ये  तिच्या त्या भावा म्हणू नका रे
ही  पैज जीव घेणी लावा म्हणू नका रे


गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे
 

ही कापते कशाने आहे अशी इमारत?
अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे


ती फुंकणीच  होती, फेकून मारलेली,
(हातात बायकोच्या, पावा म्हणू नका रे)


दोन्ही करात आहे सामर्थ्य बायकोच्या,
धारिष्ट्य आज कुठले, दावा म्हणू नका रे

हे बोल  कळकळीचे,साऱ्या कवीजनांचे
फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे

--केशवसुमार
( ०६ एप्रिल २००९,
 चैत्र शुद्ध १२, शके १९३१)