(रिंगण)

------------------------------------
श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या कवितेवरून...
------------------------------------

हो, पुन्हा शोधा जुने क्षण आपले
चोरुनी त्यांना पुन्हा म्हण आपले

होतसे अर्थाविना कविता इथे
आंधळे म्हणती विलक्षण आपले

मारल्याने थाप कोणा नेहमी
चोळले वाटे तुलापण आपले

बावळ्यांची भोवती गर्दी किती
लावती भलतेच ढक्कण आपले

जायचे तर जा तुझ्या वाटेस जा
अन्यथा तू बैस गाभण आपले

ऐक, कोणीही नसे परका इथे
मान वा सांभाळ ढुंगण आपले

वीतभर डोके तुझे काढी गळा
' जन्मभर चालेल भांडण आपले '

वाहिला आहेस तू... कोठे? कधी?
अन म्हणे की बांध कुंपण आपले

मान्य की मोठी तुझी टोपी, तरी -
फार बोले हा धटिंगण आपले

बघ जरा कोठे कितीजण पोचले
तू सदा ठोठाव रिंगण आपले