दोष कोणाचा

तू माझ्या कानात गुज सांगताना;

सारं जग मी जिंकलं होतं;

तुझ्या श्वासांचा होणारा स्पर्श;

माझ्या हृदयात मी साठवला होता.

मला अजुनही आठवतो;

तो सागराचा किनारा;

तो पहिला पाउस;

आणी ती पहिली भेट.

त्या नवखेपणावर जगताना;

मला कधीच कळालं नाही;

आपल प्रेम कधी जुनं झालं;

तुझी औळख कधी जुनी झाली.

किनाऱ्यावरच्या वाळूवरचं आपल घरटं;

तुझ्या पावलांवरच्या माझ्या पाउलखुणा;

लाटेनं कधी वाहून नेल्या;

हे कळालंच नाही मला.

तू प्रारब्धाला दोष दिलास;

मला सावरण्याचा प्रयत्न केलास;

पण खरंच सांग आपण प्रेम करताना;

प्रारब्धाला विचारलं होतं का?