चर्चा प्रस्तावासाठी विषय

                   अनेक विषय असतात ज्यावर आपली मते मांडायची असतात, दुसऱ्या जनांची मत जाणायची असतात.  स्वतःची मते जर का चूकीची असली तर ती सुधारायची असतात. दुसऱ्याची मते जर का चूकीची असतील तर योग्य काय हे सांगता येण्याची निकड ही असते. परंतु बऱ्याचवेळा ज्यांना चर्चा करायची इच्छा असते त्यांना चर्चेचा प्रस्ताव संतुलितपणे मांडता येत नाही. तर काही मंडळी नकारात्मक पणे प्रस्ताव ठेवतात. काही वेळा विशयातील मुद्द्याला केलेला विरोध व्यक्तीगत रोख वाटतो/ वाटू शकतो. अशा मुळे चर्चेत एक नकारात्मक उर्जा तयार होते.

                     माझी ह्या प्रस्तावाद्वारे अशी विनंती आहे की, मनोगत वरील सभासदांना जर एखादा विशय चर्चेसमोर ठेवायचा असेल तर तो इथं सुचवावा. चर्चेची चौकट ही सांगावी. ह्या वर मनोगत च्या प्रशासकांनी स्वतंत्रपणे त्या विशयावर संतुलितपणे, सुसंबद्धपणे व संकुचित मनोवृतिचे नसेल अशा पद्धतीत प्रस्ताव मांडावा.  असे होण्याने चर्चा जास्त चांगल्या पद्धतीने रंगू शकतील.