'यूपीएससी'त महाराष्ट्राचे सुयश

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून आनंद झाला.

मूळ बातमी : 'यूपीएससी'त 'जय महाराष्ट्र'
(ईसकाळ : मंगळवार दि. ५ मे २००९)

गोषवारा :

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सन २००८ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी.
  • राज्यातील ७०हून अधिक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण.
  • अनिकेत मांडवगणे(पुणे) राज्यात पहिला, देशात २९ वा.
  • शीतल उगले (नगर) राज्यात दुसरी, देशात ३७ वी.
  • बालाजी मंजुळे(सोलापूर) राज्यात तिसरा व देशात ५६ वा.
  • नोएडा येथील शुभ्रा सक्सेना ही विद्यार्थिनी देशात पहिली.
  • या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांना यश मिळावे, यासाठी गेली तीन वर्षे दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तामार्फत प्रयत्न.
  • मराठी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या "षटकार क्लब'तर्फे मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखतींसाठी तयारी करून घेतली जाते, असे "षटकार क्लब'चे प्रताप भोसले यांनी सांगितले.
  • निवासी आयुक्त अमिताभ राजन यांचे मोलाचे मार्गदर्शन.

परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन.

महाराष्ट्राच्या यशाची कमान अशी उत्तरोत्तर चढती राहो अशी शुभेच्छा.


ह्या निकालाची राज्यवार आकडेवारी दिलेली असते काय?

महाराष्ट्रसदनाच्या निवासी आयुक्तांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती कोणाला आहे काय? असल्यास ती येथे द्यावी, म्हणजे इतरांना लाभ होईल.

षट्कार क्लबाविषयी कोणाला काही माहिती असेल तर ती येथे द्यावी.