(सोडू नको)

संदर्भ : मिल्याची संदर गझल 'सोडू नको'

संपली सगळी तरी तू प्यायची सोडू नको
आडवाटेने प्रसंगी आणायची विसरू नको... १

नक्की तुला चढणार केंव्हा मी तुला सांगू कसे?
एवढे सांगेन की मोजायचे सोडू नको... २

उतरेल अपोआप सगळी दिसता क्षणी अर्धांगिनी
फक्त अधारा कधी खांदा तिचा घेऊ नको... ३

काय झाले जरी सभोती आप्त दिसती शेकडो
झूलणे जरी झाले जरा तरी तोल तू सोडू नको ... ४

पाहिजे तर फेक तू बाटल्यांची झाकणे
पण नव्याने पेग भरणे जाम तू सोडू नको... ५

ती न तुझी,  ना तू तिचा हे मान्य जरी आहे मला
एकव तिला एक छान कविता, लिहीणे मध्ये सोडू नको... ६