(खंत)

मूळ जमीन : खंत
जमीनदार : भूषण कटककर
कुळवाडी : खो-के

आज भेटू ये जिथे कोणीच नाही
पोचलो तेथे,तिथे तर तीच नाही

दीर, जावा, सासरे,सासू, नणंदा
दे असे घ्रर ज्यात हे कोणीच नाही

माळ शेवट घातली गेली गळ्याशी
सटकण्याची एकही संधीच नाही

बायकोला बॉस म्हणते विश्व सारे
ही अवस्था एकट्या माझीच नाही

त्या मिठीचा गंध येतो आजसुद्धा
वाटते की ती कधी न्हालीच नाही

काव्यसंख्या भूषणास्पद ती वधारे
सारखी तेजी इथे, मंदीच नाही

प्रेम माझे जेव्ह्ढे, खोक्या, तुझ्यावर
तेव्हढे पेटीवरी नक्कीच नाही