तडकलेला माळ
जळणारं रान
फेसाळता धुराळा
धुराळ्याच्या थारोळ्यांत
टळटळीत उन्हाचं
मी न्हाणं घेतोय!
गाठुळलेल्या बुंध्यावर
ठणकणाऱ्या सांध्यांवर
सोलावलेली साल
तराटलेल्या फांद्यांवर
लटकणाऱ्या कबंधागत
मी टाहो फोडतोय!
शिशिर-बहर चक्राच्या
नि वैशाख ज्वाळांचा
हा सदाचा आवर्त नाही.
मृगजळांच्या मागे जात
माझा मलाच मी
भडाग्नी दिला आहे!
तडकलेला माळ
जळणारं रान
फेसाळता धुराळा
धुराळ्याच्या थारोळ्यांत
टळटळीत उन्हाचं
मी न्हाणं घेतोय!
गाठुळलेल्या बुंध्यावर
ठणकणाऱ्या सांध्यांवर
सोलावलेली साल
तराटलेल्या फांद्यांवर
लटकणाऱ्या कबंधागत
मी टाहो फोडतोय!
शिशिर-बहर चक्राच्या
नि वैशाख ज्वाळांचा
हा सदाचा आवर्त नाही.
मृगजळांच्या मागे जात
माझा मलाच मी
भडाग्नी दिला आहे!