किती मीटर, मीटर?

आमची प्रेरणा प्राचार्य भूषण यांची रसाळ कविताः सारे शरीर शरीर १

आहे का ही कविता? की यमक शरीर शरीर
आम्हांस लागली याची फिकिर फिकिर.

उठले डोके आमचे आली भोवळ भोवळ,
पाहून कवितेचा आपुल्या विस्तार केवळ.

स्र्क्रोरलबार फिरवून न आला अंदाज काही,
लांबवली कविता, किती मीटर, मीटर?

काय लिहले आहे? काय भोग तुझा कविते?
लिहून अनाकलनीय आता वाढवली आभुषणे.

हे बरेच झाले कुणी येथे न तुझा वाली कविते,
गझलेस आहेत तिथे कित्येकजण सांभाळणारे.

अ ब क ड शिका, इयत्ता पहिली-वहीली
जे जे बरळतो, ते ते लिहीतो काही बाही,

वाचून आले आमुच्या अंगावरी शहारे शहारे,
कुणी जाउनी त्या कवीस हे कळवा रे,

आपला शहारलेला.
अप्पा जप्पा गप्पा