अपकीर्त होईल, सत्कार नाही
म्हणुनी तुझे नाव घेणार नाही
भीता किती, संस्कृतीरक्षकांनो ?
हे प्रेम आहे, अनाचार नाही
असहाय्य नाहीस तू फक्त येथे
(आकाशही का निराधार नाही ?)
सूर्यासही ग्रासती राहु-केतू
चुकला कुणालाच अंधार नाही
गाभ्यात का देवळाच्या उभी तू ?
का देव निर्गुण, निराकार नाही ?