(साहसे!)

स्फूर्तिस्थान : प्रदीप कुलकर्णी यांची गझल 'साहसे!'

.................................
साहसे!
.................................

विडंबन जाहले नाही कसे काही?
कुणीही वाचले नाही जसे काही!

प्रयासाने किती ही लाभली कविता...
सुचू लागेल आता द्वाडसे काही!

गडे, या काफ़ियांना चालवा आधी...
असू द्या ओढले, बेजारसे काही!

उन्हाळा सोसण्याला पाहिजे संत्री...
दिसे देशी समोरी 'बार'से काही!

सखा घेईल कोणी माग डोळ्यांनी...
सखे, तू नेस लुगडे छानसे काही!

तशी वायाच गेली भेट दोघांची...
'तसे' करता न काले फारसे काही!

कुणाच्या बायका सोडूनही गेल्या...
इथे का होत नाही रे तसे काही?

बघू या पाडता येतात का कविता...
मला दे शब्द तू बंबाळसे काही!

नको रे कोपर्‍याच्या सीट तू शोधू...
घरी दिसतील आईला ठसे काही!

- खोडसाळ

.................................
पुनर्रचनाकाल ः २ जुलै २००९
.................................