बेवडा

प्रेरणास्त्रोत - कटककरांचा 'बोकड'

पितोच आहे तसाही, तर चकणा द्यावा आणखी

बेवड्याला वाटते, पीत राहावी आणखी,

बेवड्यांना मदिरा हवी, विदेशी वा देशी असो,

संपताना हीच इच्छा की, मिळावी आणखी,

व्हिस्की झाली रम झाली, पिऊन झाली देशी,

बेवड्याला हे कळेना, काय प्यावे आणखी,

वेळ गाडीला जरा, बार आहे, थांबू या,

सुटली गाडी तरी वाटे, पीत बसावे आणखी

आपल्या कळपातला मेला, बेवडा प्यायल्यामुळे

तरी आपण, त्याच जागी प्यावी आणखी,

खिशात आता दमडी नाही, दुःख बेवड्याला असे

बारवाल्यांचे काउंटर सारे, ओसंडवावे आणखी,

पितात येथे व्हिस्की कुणी, मागवितात व्होडका कुणी

ज्याला सवय देशीची, त्याला कोणती चढावी आणखी?