त्या विधात्याने मलाही दिधली प्रीती ही

गे सखे दिधले तुला  हे चंद्रानन ज्याने।
त्या विधात्याने मलाही  दिधली प्रीती ही......॥ध्रु॥

उचलुनी घेसी जरी फूल  लचक हाती भरे 
आहे बनवीले तुला  'त्या' ने ग नाजुक इतके
ज्या कशाला मी करू  स्पर्श, ते होई माझे....॥१॥..त्या विधात्याने मलाही  दिधली प्रीती ही......

राहिलो चालत तव  सुंदर वाटेवरुनी
तव प्रेमाने मला दिधली  ही हिम्मत इतकी
पाही गे ममहृदयाला  कुठवरी आहे मी....॥२॥..त्या विधात्याने मलाही  दिधली प्रीती ही......

आणशी जर मनी तर  नाचवशिल या ग जगा
वाढवी स्पंदने ग, चाल  तुझी, हृदयाची
मनी जर आणिले मी  पाषाणही स्रवू लागे....॥३॥..त्या विधात्याने मलाही  दिधली प्रीती ही......