आनंदाचा घन

माझ्या अंगणात यावा आनंदाचा घन
आणि चिंब-चिंब व्हावे आनंदून मन...

माझ्या अंगणी फुलावी आनंदून कळी
आनंदाचे कारंजे अन आनंदाची तळी...

माझ्या अंगणात यावे आनंदून पक्षी
आनंदाचे कवडसे, आनंदाची नक्षी...

आनंदाच्या चांदण्यात निथळावी रात
आनंदच पहाटेच्या प्राजक्तफुलांत...

दुःख सोसले मी आहे आजवर फार
आज आहे केले खुले आनंदास दार!...