शाही टुकडा....

  • स्लाईस ब्रेड
  • साखर
  • कंडेन्स्ड मिल्क
  • पिस्त्याचे तुकडे
  • तळण्यासाठी तूप
२० मिनिटे
याला प्रमाण नाही हो. ते ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून आहे.

प्रथम एका ब्रेडच्या स्लाईसचे ४ भाग कापून घ्यावेत. असे सर्व ब्रेड कापून घ्यावेत.

एका गॅसवर साखरेचा पाक करावयास ठेवावा. साखर भिजण्यापुरतेच पाणी घालावे.

दुसर्या गॅसवर तळण्यासाठी तूप ठेवावे. तूप चांगले तापले की मग ब्रेडचे तुकडे लालसर तळून घ्यावेत.

टीपकागदावर तळलेले तुकडे ठेवावेत. तूप निथळते.

नंतर ते तुकडे गरम पाकात टाकावेत. थोडा वेळ ठेवून लगेच काढून घ्यावेत.

एका पसरट डब्यात सारे ब्रेडचे तुकडे ठेवावेत.

त्यावर वरून कंडेन्स्ड मिल्क ओतावे. वरून पिस्त्याचे काप घालून सजवावे.

आणि मग कॅलरीजचा विचार न करता खावे.

साखरेचा पाक नको असेल तर  तुम्ही 'स्वीटंड कंडेन्स्ड मिल्कही' वापरू शकता. करायला अजून सोपे.

पण पाकात टाकण्याचा फायदा असा की ब्रेडमधले  तूप गरम पाकामुळे पूर्ण निघून जाते.

माझी मैत्रिण..... तिचे आईबाबा कुवेतला आहेत. तिथली ही पाककृती.