१) मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा
...... रावांचे नांव घेऊन मान राखते सर्वांचा
२) मंगळसूत्र आहे हा सौभाग्याचा अलंकार
..... रावांच्या सह माझी स्वप्ने होवोत साकार
३) हृ्दयरुपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी
... रावांचे नावाने बांधले मंगलमणी
४)निरोपाच्या प्रांगणात पडला स्मृतिगंधाचा सडा
..... रावाच्या सोबत चालले घेऊन आशीर्वादाचा घडा
५)सारवलेल्या प्रांगणात शोभे पंचरंगी रांगोळी
... यांची कन्या आता .... रावांचे घर सांभाळी
६)स्त्री व्हावे लागते मनांत समर्पण भाव यायला
....... रावांचे नाव घेते मी लक्ष्मीपूजनाला
७)आरसा समाजाचा, हा जपतो संस्कृती
.... रावांच्या घरातील मी चालवीन चालीरिती
८) गीतात जसा भाव, फुलात असे गंध
..... रावाबरोबर जुळले माझे रेशमी बंध
९) तू दवबिंदू पहाटेचा, मी सूर्यकिरण सोनेरी
... रावाना घास देऊन, जीवन करते चंदेरी
१०) घराच्या परसात वृंदावनी डोले हिरवी तुळस
..... रावांच्या संगे गाठीन सुखाचा कळस