ह्या देशात असेही घडू शकते.

आजचा सकाळ चाळला, त्यातल्या पान नं ९ वरील बातमीने लक्ष वेधून घेतले ती बातमी अशी. "नागरिक नसतानाही तीनदा खासदार " त्यात लिहिले होते की. आसाममधील तेजपुर येथून तीनदा निवडून आलेले कॉग्रेसचे माजी खासदार मोनीकुमार उर्फ एम. के. सुब्बा हे भारताचे नागरिक नाहीतऽसा अहवाल सीबीआय ने सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. मी ही पूर्णं बातमी येथे लिहिण्याचे टाळतो. त्या बातमीनुसार त्यांनी १९९८ च्या निवडणुकीत वेगळी जन्मतारीख व २००४ च्या निवडणुकीत वेगळी जन्मतारीख व वेगळे जन्मठिकाण लिहिले होते.

या सर्वात विस्मित करणारी बाब म्हणजे त्यांची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ विधिज्ञ व काँगेसचे प्रवक्ते श्री. अभिषेक मनु सिंघवी यांनी लढवली. हे सर्व ठीक आहे. पण या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात.

१) काँग्रेसला  आपल्या उमेदवाराचे " राष्ट्रीयत्व " तपासून पाहावेसे का वाटले नाही.

२) निवडणुक आयोगाला सुद्धा ही बाब खटकली नाही.

३) जोपर्यंत कोणी न्यायालयात जात नाही तोपर्यंत हे प्रकार असेच चालत राहणार का ?

४) याच प्रकारे एखादा 'पाकिस्तानी घुसखोर " किंवा " बांगलादेशी " घुसखोर अशा प्रकारे खासदार झाला तर आपल्या संसदेचे काय ?

५) याबाबतीत बाकीचे "राजकीय पक्ष " काय भूमिका घेतील.

६) आणि शेवटची पण महत्त्वाची बाब अशी की सर्वसामान्य भारतीय नागरिकाचे काय /

मला या बाबतीत तुमची मते अजमावून पाहावीशी वाटतात. तर आपल्याला काय वाटते ?

उद्या मुंबैतून एखादा "बांगलादेशी " माणूस खासदार म्हणून निवडून आला तर ?