आयुष्य
------------------------
कसरत किती जिवाची दररोज नाचताना!
कळते कुणास; पाणी डोळ्यात साचताना?
मुर्दाड होउनी मन गेले कधीच माझे...
पीडा कशास व्हावी मग त्यास काचताना
तुकडा तुझ्या जिवाचा नांदे कुठे तरी ना?
हे जाणवे न तुज पण सू(सु)नेस जाचताना!
शिवले किती मनाला, उसवेच ते तरीही...
पण आस केवढी दरवेळेस टाचताना!
मळले किती ठिकाणी पुस्तक तुझ्या जिण्याचे
समजो तुझे तुला हे आयुष्य वाचताना!
... आरती कदम