ने मजसी ने (व्होटरास साद)

ने मजसी ने नविन विधानसभेला  व्होटरा प्राण तळमळमला
                    तळमळला  व्होटरा

भूखंडाचा घास चघळतो नेता, मी रोज पाहिला होता
मज वदला तो"तिकीट तुजला देऊ,चल दोघे मिळुनी खाऊ"
पण हृदय 'हि'चे उगीच शंकित झाले परी तिला वचन मी दिधले
"मी रोज तुला दगिन्यात मढवीन पोत्याने धन आणीन"
हरखलोच स्वप्नामधुनी मी,खोकेपेट्यांवर बसुनी मी,
बायकोस म्हटले हसुनी मी 'आणीन हिरे तिथुन रोज मी तुजला
                               व्होटरा प्राण तळमळमला

घरी पैशाची रास तरीही द्यावी मज MLAची पदवी
प्रासाद इथे भव्य तरी द्या खोली MLA हॉस्टेलवाली
तिजवीण नको घास भूखंडाचा हा व्यर्थ भार पैशाचा
एरवी गडी तू रामा रे,म्हणतोय अता तुज 'मामा'रे,
आणलाय जाहिरनामा रे,या भाच्याची शपथ घालतो तुजला
                      व्होटरा प्राण तळमळमला

फुलवून मिशा हसशी निर्दया कैसा मजकडे मागशी पैसा
अनुभवच नसे काहिच मज देण्याचा मी सेवक आहे तुमचा
मी अबल अता म्हणुन असे अडवीशी, मागतोस वर तू देशी
एरवी कसे मज भीता रे,लाचार होउनी रडता रे,
कथिन हे भाइला आता रे, जो आचमनी एक विदेशी प्याला
व्होटरा अता का भ्याला दे निमूट मत तू मजला
                       व्होटरा.... व्होटरा