या व्यक्ती नक्की कोण..?

"ही माणसं तुम्हाला खरोखरीच भेटली आहेत का हो?"
या प्रश्नावर पुल म्हणतात,
"म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. ललित साहित्यात असे प्रश्न संभवत नाहीत."

पुलंच्या या उत्तराने गूढ अधिक वाढलेले आहे पण एक गोष्ट स्पष्टही झालेली आहे. त्यांना या व्यक्तीं आणि वल्ली काही स्वरुपात भेटल्या नक्कीच आहेत. त्यात त्यांनी स्वतःच्या कल्पनेचे रंग मिसळले आहेत.
हे मी वाचलेले आहे. 'गणगोत' मधील व्यक्तिरेखा खऱ्या होत्या. पण 'व्यक्ती आणि वल्ली' मधील व्यक्तिरेखा सत्य आणि कल्पिताचे मिश्रण आहेत.

याबाबत एका संपादक मित्राला विचारले असता तो म्हणाला,
"अरे, सखाराम गटणे म्हणजे डॉ.आनंद यादव."

उर्वरीत व्यक्तिरेखांची मूळ रुपे कोणाला माहिती असली तर द्यावी.
उत्सुकता आहे.