ज्यांना कविता जमतात, त्यांनी कविता कराव्यात, ज्यांना विडंबने जमतात, त्यांनी विडंबने करावीत. हे जर सगळे इतके सोपे आहे, तर ज्यांना काहीच जमत नाही अशा आमच्यासारख्या अंगुलीकंडग्रस्त कळपटव्यसनग्रस्तांनी काय करावे?
जयंतराव, तुम्ही आमचीही 'मजबूरी-२' समजून घ्याल अशी आशा करतो.
ना कासोट्यात जमले, ना बांधण्यास जमले
धोतर मला जरी ते, गुंडाळण्यास जमले
गाठीवरी बसावी, दुसरी मुजोर गाठ
परी वळ्कट्या कटीच्या, ना सावरण्यास जमले
अवगत अनेक होत्या, रीती मला परंतु
ते वसन शुभ्र अंती, चुरगाळण्यास जमले
बस पाहिले तुला अन, काष्टा कटी टिकेना
लज्जा कशी बशी ती , सावरण्यास जमले
दिन रात कुत्री भो भो, पळता पुरेना वाट
पायात पाय अड्कवुनि, धडपडण्यास जमले
हे सर्व झाले तेंव्हा कोजागिरी असावी
दुसऱ्या दिनी तरीही, ना हपिसास जाणे जमले