कोमट पाणी, भंकस गाणी आणि गळाला साबण !

आमची प्रेरणाः
 
कोमट पाणी, भंकस गाणी.. आणि गळाला साबण
रोज कशाला हेच सकाळी? रोज कशाला साबण?


झोप जरा मी काढत होतो मुक्त मनस्वी तेव्हा,
माय म्हणाली, "ऊठ करंट्या, लाव तनाला साबण!"


स्कूटीवरची पोर म्हणाली- 'ये, चल माझ्यासोबत'
इतक्या दिवसानंतर आला आज फळाला साबण..


'फेस कुठे अन केस कुठे..' हातात कसा मी घ्यावा?
अंघोळीच्या नंतर थोडा लाव नळाला साबण!


दौलत माझी अजून इतकी वरती नाही आली,
तू न प्रियंका, तू न बिपाशा.. तुला कशाला साबण?


मान अशी की भान न राही साफ तिला करण्याचे,
काळी पडल्यानंतर घासा लाख 'उजाला' साबण.


वाटत होती काय मला अन काय कवीता झाली?
'खान' कवी की परीट तू? हे मला म्हणाला साबण !
++++++++++++++++++++++++++++++