एखाद्या वस्तूची, प्रसंगाची, व्यक्तीची जाहिरात करणे अती आवश्यक झालेले आहे हे मान्य करावेच लागते. जाहिरात करण्यामागे ठराविक योजनाबद्ध उद्देश हा असतोच हेही तितकेच सत्य आहे. ह्या जाहिरातीचे माध्यम, त्या माध्यमाचा मोजावा लागणार्या खर्चाचा विचार करावाच लागतो. हा खर्च कोणाच्या खिशातून होतो ह्याचा विचार करणे तितकेच आवश्यक ठरते. जाहिरात असणार्या वस्तूशी, व्यक्तीशी, सेवेशी जेव्हा माझा संबंध एक ग्राहक / उपभोगता म्हणून असतो तेव्हा त्या जाहिरातीशी संबंधीत सगळ्या गोष्टी समजून घेणे माझे कर्तव्य आहे असे माझे मत आहे.
सध्या भारतीय जीवन विमा कंपनी एक जाहिरात फार मोठ्या प्रमाणात दाखवते आहे. लहान मुले रस्त्यावर बर्फाचे गोळे विक्रेत्या कडून घेऊन मजेत खाताना दाखवले आहे. एकीकडे स्वाईन फ्ल्यूच्या जाहिरातीचा धुमाकूळ आणि दुसरीकडे भा.जि.वी. ची ही जाहिरात. शिकलेल्या धेंडांची, उच्च अधिकार्यांची नीच कारागिरी मी एक ग्राहक हताश पणे दिवस रात्र सगळ्या माध्यमातून हताश होऊन बघत बसतो. नव्हे मला बघावेच लागते.
आज पर्यंत बेदाग असण्याला महत्त्व होते, पण दाग अच्छे है हे पटवून देणे काळाची गरज असावी. तसेच शाळेतून दानपेटी फिरवण्याचे प्रकार शिकवले जातात तिथे काळाची गरज म्हणून कुत्रा होणे ही आजची शिक्षणाची गरज असावी. अशीच सर्फ एक्सेल उत्पादकांना काळाची गरज जाणवली आहे. कारण मागासलेले असणे वाईट होते त्याला रिझर्वेशन मिळणे ही पण काळाचीच गरज झाली आहे. ७२ घंटे ह्या गर्भ नियंत्रण जाहिरातीतून तमाम अनैतिकतेला - हा मार्ग मोकळा - हे जाहिरात करून पटवून देणे ही काळाचीच गरज आहे. प्रत्यक्षात नैतिक संबंध असणारे डॉक्टरचा सल्ला बीन्धास घेऊ शकतात, त्याचा फायदा उत्पादकाला कमी झाला. अनैतिक संबंध वाल्यांना ह्याची जरूर जास्त म्हणून दिवसा सगळ्या चॅनलवर ही जाहिरात करणे काळाची नव्हे उत्पादकाची गरज झाली आहे. व्होट बॅन्क बनवण्यात समलैंगिकतेला कोर्टाची मान्यता देणे ही एक काळाचीच गरज झाली आहे. जिथे बारबालांचा डान्स ही अश्लीलता असते तिथे कमी कपडे घालून रॅम्पवर चालणे काय किंवा अर्ध नग्न नाचाच्या प्रकाराला पहिले बक्षीस मिळणे ही एक काळाचीच गरज झाली आहे. त्या आयोजकांनी नाचणार्या मुलीचे / बाईचे जास्तीत जास्त अंग प्रदर्शन दाखवावे व मुलाने / पुरुषाने कमीतकमी अंग प्रदर्शन करावे असा कायदा करणे ही त्यांना जाणवलेली काळाची गरज ठरवली आहे.
कायदेभंगाची चळवळ / वळवळ करून आम्ही स्वातंत्र्य मिळवू शकतो हे सिद्ध करणार्या आटोकाट प्रयत्ननांची जाहिरात ही पण राजकारण्यांची गरज ह्याचा अनुभव रोजचाच आहे. कायदे भंग करून त्यातून सुटता यावे, अमाप संपत्ती लुटता यावी असेच कायदे करणे ही अजून एक वेगळी काळाची गरज. म्हणूनच कायदेभंगाचा वापर करून नाव, प्रसिद्धी, नेता, समाजसेवक, अधिकारी वगैरे होण्याकरता तशाच प्रकारचे शिक्षण देणे - घेणे ही काळाचीच गरज आहे.
वाचकहो मी माझे विचार स्वातंत्र्य समजून हे लिहिले तुम्ही तुमचे वाचन स्वातंत्र्य समजून हे वाचावे.