कालची संध्याकाळ दोन प्रतिभावंत माबोकरांसमवेत घालवण्याची संधी मिळाली. श्री. गिरीश कुलकर्णी आणि श्री. जयंत कुलकर्णी उर्फ 'जयन्ता५२'! जयंतदा मनोगतवरही आहेतच. फेसाळणाऱ्या बिअरच्या सोबतीने गिरीशजींच्या कवितांबरोबरच जयंतदांच्या गझला आणि अनुभवांचा खजिना उलगडत गेला. क्षणभर असं वाटून गेलं...
" हुजूर.., पिलाने की बाते करते है!
कंबख्त..! हम तो बातोंसे नशा पाते है! "
त्या दोन प्रतिभावंताचा खजिना खोदता - खोदता माझ्या हाती माझंच काही सटर फटर सामान आलं.....
खुब जमेगी जब...
मिल बैठेंगे दिवाने तीन
दोन तुझे..., दोन त्याचे...
एखाद दुसरे माझेही सीन...!
गुणगुणणारी, गुंगवणारी
तुझी रंगेल कविता आणि...
फेसाळलेल्या बिअरचे मस्तावलेले टीन...!
तुझी कविता....
किती हळुवार आणि तरीही घनगर्द...!
किती सावरलं तरी भान विसरायला लावते...
तुझी गझल अन तिचा तो मखमली दर्द!
आता नकोच त्या जखमा अन नस्ते झांगडगुत्ते,
नकोच..., पिसून-पिसून कंटाळलेले...
आळसावलेले हुकुमाचे पत्ते!
चल......
मिळून सोडवू....
तुझ्या बोलक्या कवितेतले अबोल गुंते!
अरे हट...!
कालची बिअर मला चढलीच नाही...
तुझी गझलच एवढी जालीम होती...
ती क्षुद्र वारुणी मला बाधलीच नाही!
विशाल.