तह

शस्त्रे ठेवून खाली चिलखत उतरून ठेवूया,
हलक्या छातीमध्ये आणि श्वास भरुन घेऊया!

काढून कवच-कुंडले सारी दान करुन टाकूया,
येणाऱ्या अर्जुनांचे आणि हसून स्वागत करुया!

रणांगण टाकून मागे दूरचे डोंगर पाहूया,
असतील तेही साजरे म्हणोनी तिकडे पळून जाऊया!

तिथे पोचल्यावर तिथल्याही नव्या लढाईत उतरूया,
शस्त्रे ठेवून दिली होती, आता लढून पाहूया!

व्यर्थ प्रयत्न करून सारे हरली लढाई जिंकूया
आयुष्याशी तह करोनी अंती निवांत झोपी जाऊया!!