आजच्या ईसकाळात ही बातमी वाचायला मिळाली. बातमीत शासकीय पुरस्कारप्राप्त वाङ्मयाची आणि लेखकांची यादी दिलेली आहे. ही यादी मनोगतींना पुस्तके निवडायला वाचायला उपयोगी पडावी म्हणून संदर्भ ह्या उद्देशाने मूळ बातमी सकट येथे उतरवून ठेवलेली आहे.
ईसकाळातली मूळ बातमी : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार जाहीर
गुरुवार दि. ३ डिसेंबर २००९
मुंबई - राज्य सरकारचे सन 2008-09 चे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार आज येथे जाहीर करण्यात आले. पुरस्कार प्राप्त लेखकामध्ये विश्वास पाटील (नॉट गॉन विथ द बिंड) गिरीश कुबेर (अधर्म युद्ध) शरद जोशी (अंगारमळा) यशवंत रांजणकर (वॉल्ट डिस्ने), किशोरी आमोणकर (स्वरार्थरमणी), न्या. नरेंद्र चपळगावकर (विधिमंडळ आणि न्याय संस्था- संघर्षाचे सहजीवन), डॉ. जनार्दन वाघमारे (बदलते) शिक्षण स्वरूप आणि समस्या हेरंब कुलकर्णी (परीक्षेला पर्याय काय? ) आदींचा समावेश आहे. सांगली येथे 14 फेब्रुवारी 2010 रोजी विष्णुदास भावे नाट्यमंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
अन्य पुरस्कार प्राप्त लेखकात डॉ. अशोक रानडे, डॉ. यशवंत मनोहर, ग. प्र. प्रधान, सदानंद देशमुख, कविता महाजन, सुमेध वडावाला यांचा समावेश आहे. महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड केली. या वर्षापासून पुरस्कारांची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्काराची रक्कम पाच हजार ते वीस हजार रुपयांची झाली आहे. एकंदर 1301 पुस्तकातून 83 पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार प्राप्त लेखकांची नावे त्यांच्या पुस्तकासह पुढीलप्रमाणे -
काव्य
20 हजार रुपये
डॉ. यशवंत मनोहर (स्वप्रसंहिता), अशोक कोतवाल (कुणीच कसे बोलत नाही),
10 हजार रुपये
ऋख्विज सतीश काळसेकर (काळोखाच्या तळाशी),
5 हजार रुपये
कविता महाजन (मृगजळीचा मासा),
नाटक - 20 हजार रुपये
1) चंद्रकांत प्रभाकर देशपांडे (बुद्धिबळ आणि झब्बू)
2) चंद्रशेखर फणसळकर (खेळीमेळी),
10 हजार रुपये
जगतकुमार आ. पाटील (आसाचा फेरा),
5 हजार रुपये - ज्ञानेश महाराव (जिंकू या दाहीदिशा)
कादंबरी - 20 हजार रुपये
अंबिका सरकार (अंत ना आरंभही),
20 हजार रुपये (विभागून)
संजय भास्कर जोशी (श्रावणसोहळा) आणि शरणकुमार लिंबाळे (झुंड)
10 हजार रुपये-
राजा कदम (अवशेष),
5 हजार रुपये
बाळाजी मदन इंगळे (झिम पोरी झिम)
लघुकथा
20 हजार रुपये - अनिल रघुनाथ कुलकर्णी (तळ्याकाठच्या सावल्या)
10 हजार रुपये
वसू भगत (प्रकाशाची झाडे)
5 हजार रुपये - सदानंद देशमुख (खुंदळ घास),
ललित गद्य - 20 हजार रुपये
जोंधळे (किरण पाणी), विश्वास पाटील (नॉट गान विथ द विंड)
10 हजार रुपये - प्रकाश गोविंद कुलकर्णी (नव्या क्षितिजाच्या प्रदेशात)
5 हजार रुपये - सौ. सुप्रिया अनिल वकील (पॉप कॉर्न)
एकांकिका -
20 हजार रुपये - डॉ. विनिता परांजपे (रहस्यभेदी)
10 हजार रुपये - अविनाश नारायण चिटणीस (बादशाह आणि इतर)
5 हजार रुपये - डॉ. सतीश साळुंके (अवस्थतरीही)
विनोद -
20 हजार रुपये - डॉ. शरद बर्वे (झुळूक अमेरिकन ताऱ्याची)
5 हजार रुपये श्रीकांत बोजेवार (दोन फूल एक हाफ)
संकीर्ण -
20 हजार रुपये - गिरीश कुबरे (अधर्म युद्ध)
5 हजार रुपये - विदूर महाजन (मैत्र जिवाचे)
ललित विज्ञान
20 हजार रुपये विभागून
डॉ. प्राची साठे (जीवन मृत्यूच्या सीमारेषवरून)
सौ. सुधा रिसबूड (कल्पित अकल्पित)
5 हजार रुपये - डॉ. अजित पाटील (देशोदेशीचे विज्ञानेश्वर)
चरित्र
20 हजार रुपये - यशवंत रांजणकर (वॉल्ट डिस्ने)
5 हजार रुपये - सुमेध वडावाला (मनीश्री),
आत्मचरित्र
20 हजार रुपये - शरद जोशी (अंगार मेळा)
5 हजार रुपये - आशा दस्तगीर अपराध (भोगले जे दुःख त्याला),
समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र
20 हजार रुपये - अशोक रामचंद्र केळकर (रुनुवात),
10 हजार रुपये - डॉ. अशोक रानडे (संगीत विचार)
10 हजार रुपये - डॉ. आनंद पाटील (टीका वस्त्रहरण)
5 हजार रुपये - श्रीमती किशोरी आमोणकर (स्वरार्थरमणी)
इतिहास -
20 हजार रुपये - के. के. चौधरी (झुंजार पुणे-)
5 हजार रुपये - डॉ. साहेब खंदारे (मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास खंड-1)
अर्थ शास्त्र
20 हजार रुपये - सी. पं. खेर (नवप्रवर्तन सूत्र आर्थिक विकासाचे)
5 हजार रुपये - यशवंत अनंत पंडितराव (आधुनिक अर्थशास्त्राचे निर्माते)
राज्यशास्त्र व समाजशास्त्र
20 हजार रुपये डॉ. सुधाकर देशमुख (राष्ट्र आणि राष्ट्रवाद)
4 हजार रुपये - न्या. नरेंद्र चपळगावकर (विधिमंडळे आणि न्यायसंस्था- संघर्षाचे सहजीवन)
तत्त्वज्ञान व मानसशास्त्र
20 हजार रुपये राजीव साने (नवपार्थ हृदयगतः
शिक्षण शास्त्र
20 हजार रुपये - डॉ. जनार्दन वाघमारे (बदलते शिक्षण स्वरूप आणि समस्या)
भाषाशास्त्र व व्याकरण
20 हजार रुपये - डॉ. हरिश्चंद्र बोरकर (भाषिक भ्रमंती)
भौतिकशास्त्र व तंत्रविज्ञान -
20 हजार रुपये विभागून
विनोद कुमार सोनावणे व सुधाकर आगरकर(कृतीप्रधान विज्ञान अध्यापन)
डॉ. रामचंद्र नऱ्हे व डॉ. सुलभा कुलकर्णी
(निसर्गातील नॅनो रचना विज्ञान5ान व तंत्रज्ञान)
दलितांवरील साहित्य
10 हजार रुपये - डॉ. माहेश्वरी गावित (आदिवासी साहित्य विचार)
अनुवादित
20 हजार रुपये चंद्रकांत पाटील (कवितांतरण)
10 हजार रुपये - प्रा. पुरुषोत्तम देशमुख (द डार्क होल्डस नो टेरर्स)
संपादित
20 हजार रुपये - हेरंब कुलकर्णी (परीक्षेला परीक्षा काय? )
10 हजार रुपये - अविनाश पाठक (मराठी वाङ्मय व्यवहारः चिंतन आणि चिंता)
आधारित
20 हजार रुपये - डॉ. विठ्ठल वाघ (म्हणी कांचन)
संशोधन -
20 हजार रुपये - भिवाजी शिवाजी शिंदे (तमाशातील सोंगाड्या)
ललितकला आस्वाद
20 हजार रुपये (विभागून) माधव वझे (रंगमुद्रा)
विजय पाडळकर (गंगा आये कहा से गुलजार एका दिग्दर्शकाचा प्रवास)
शेती -
20 हजार रुपये (विभागून ) डॉ. राजेंद्र देशमुख (अशी फु लवा परसबाग)
श्यामराव करम (पाणलोट विहिरी)
शेतीपूरक व्यवसाय -
20 हजार रुपये विभागून कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री,
डॉ. अधिकराव जाधव, संजय धामणे (किमया रेशीम शेतीतून लक्षाधीश होण्याची)
क्रीडा विभाग
20 हजार रुपये - नंदू नाटेकर (क्रीडा गाथा)
संगणक, इंटरनेट
20 हजार रुपये - प्रा. सुभाष, पवार (किमया फोटोशॉपची)
पर्यावरण
20 हजार रुपये - अरुणा अंतरकर (कथा आधुनिक दंडकारण्याची)
बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
20 हजार रुपये - देवेंद्र कांदोलकर, गोवा (सागरशाळा),
20 हजार रुपये - पांडुरंग गावकर, गोवा (नंतर)
बालवाङ्मय
कविता - 20 हजार रुपये - डॉ, संगीता बर्वे (खारूताई आणि सावलीबाई)
20 हजार रुपये - एकनाथ आव्हाड (गंमत गाणी)
चरित्र
20 हजार रुपये - ल. म. कडू (मारिया मॉंटेसरी)
20 हजार रुपये - प्रा, श्रीकांत नाईक (मुलांचे पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक)
सर्वसामान्य ज्ञान
20 हजार रुपये - हेमंत जोगदेव (असे आहे ऑलिंपिक)
20 हजार रुपये विभागून - प्रकाश नवाळे (1 विज्ञान 2 आपल्या सभोवताली)
20 हजार रुपये - ग. प्र. प्रधान (लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी व ज्ञानाचे उपासक)
20 हजार रुपये - डॉ. सतीश साळुंके (परिवर्तन प्रकाशन)
20 हजार रुपये - श्रीनिवास सिंदगी (भूमिपुत्रांचे वनपूजन बालनाट्य)
बाळकादंबरी
20 हजार रुपये - सौ. शैलजा काळे (कर्मयोगी )
20 हजार रुपये - गिरिजा कीर (प्रकाशाची दारे)
20 हजार रुपये - राजीव तांबे (छत्रीची जादू व इतर कथा)
20 हजार रुपये - डॉ. प्रभाकर चौधरी (दूरदेशीच्या लोककथा, )
ललित गद्य-
20 हजार रुपये - गिरिजा कीर - (छान छान गोष्टी)
विभागून डॉ. भगवान अंजनीकर (निर्मल प्रकाशन)
20 हजार रुपये विभागून - अरुण देशपांडे (बालसाहित्य मराठवाड्याचे नवा स्वरूप)
प्रा. संजय कावान (कॉमिक्सचे विश्व)
यातली काही पुस्तके आपण वाचली आहेत का? वाचली असल्यास मनोगतावर आस्वादाच्या रूपाने माहिती दिल्यास इतरांनाही त्याचा लाभ होईल.