अमुक गोष्ट कशी करावी ह्याचा संग्रह

मला नेहमी प्रश्न पडतो की अमुक एक गोष्ट कशी करावी हे जाणून घेण्यासाठी एखादी वेबसाईट आहे का? सध्यातरी माझ्या पाहण्यात कुठलीही मराठी वेबसाईट नाही आहे. अशी एखादी वेबसाईट जर उभारली, तर आपल्याला त्यात योगदान देण्यात स्वारस्य असेल का? त्या साईटवर खालीलपैकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरे टाकण्यास हरकत नसावी. जसे,

  • उकडीचे मोदक कसे करावे?
  • ए. टी. एम. कार्ड कसे वापरावे?
  • सभाधीटपणा अंगी कसा बाणवावा?
  • कारचा (अर्थातच पंक्चर झालेला) टायर कसा बदलावा?
  • इस्त्री कशी करावी?

अगदी खालील गोष्टीसुद्धा असण्यास हरकत नसावी,

  • पुण्यात सायकल कशी चालवावी?
  • सिंहगड रस्ता कसा ओलांडावा?
  • मुंबईत विद्याविहारला ट्रेन पकडून मुलुंडला कमीतकमी त्रासात कसे उतरावे (ह्यात मोबाईल आणि पाकीट कसे सांभाळावे हे आलेच)?
  • चितळेमधून सुरळीच्या वड्या कधी कश्या मिळवाव्यात?

जरी ह्यातील करी विनोदाचा भाग सोडला, तरी अशी साईट असणे सर्वांच्याच फायद्याचे ठरेल. सध्या अशी साईट इंग्रजीमध्ये अस्तित्वात आहे. http://www.wikihow.com/

मराठीमध्ये वरीलप्रकारे माहीती संग्रहीत करण्यासाठीची वेबसाईट बनविण्यासाठी एक (विनंती करणारे) वेबपेज तयार आहे. ज्यात इच्छुकांनी आपले अकाउंट उघडून नाव टाकणे अपेक्षित आहे. जर त्या वेबसाईटवाल्या लोकांना त्या पेजवर पुरेशी टाळकी दिसली आणि त्यांच्या हृदयाला पाझर फुटला, तर ते आपल्या साईटसाठी एक ओसरी उघडून देण्याची तजवीज करतील.

जर कोणाज वळ अधिक चांगल्या कल्पना असतील किंवा त्यांना ही नसती उठाठे व/लंगडा प्रयत्न/आरंभशूरपणा वाटत असेल तर तसे स्पष्ट नमूद करावे. :)

अरेच्च्या, विनंती करणारे वेबपेज टाकण्यास विसरलो (http://www.wikihow.com/wikiHow:Marathi-wikiHow-Project)