लालबत्ती विभाग

सुधाने खरे तर बाब्याला मनातून केव्हाच सोडून दिले होते. आपला सात वर्षांचा मुलगा निलेश आणि आपण एवढाच संसार ती मानत होती. तिला स्वयंपाक गॅसच्या कंत्राटदाराकडे असलेल्या नोकरीवर महिना अडीच हजार मिळत होते. सासऱ्यांनी स्वतःच्या आयुष्यात एक भाड्याने घेतलेली खोली टिकली होती. मरताना बायकोलाही, म्हणजे सुधाच्या सासूला ते महिन्याची नोटिस देऊन गेले होते. आता राजा, राणी अन राजपुत्र असा संसार उरलेला होता. पण लवकरच बाब्याचे गुण दिसून आले. 
सकाळ खोलीत, दुपार गुत्त्यावर अन संध्याकाळ ते मध्यरात्र असा काळ तो रेश्माकडे काढत होता. मध्यरात्री आला की मेल्यासारखा लवंडायचा. जरी सुधाला मारत बिरत नव्हता तरी तिने जपलेले पैसे चोरणे, कुणाकडून उधार घेणे असे प्रकार करून चोचले पुरवत होता. आठवड्यातून एक दोनदा भांडणे झाली की सुधा निलेशला कुशीत घेऊन झोपून जायची. पण आज फारच झाले होते. आज सुधाने फार मोठे धाडस करायचे ठरवले होते. हे करताना तिला प्रचंड लाज वाटत होती, पण निलेशच्या सुखासाठी दुसरा पर्याय उरलेला नव्हता.

सुधा घरातून निघाली. साधी साडी नेसून ती आज तरातरा निघाली होती. कधी नव्हे तो तिने डोक्यावरून पदर घेतला होता. काय होणार याची तिलाही कल्पना नव्हती.

जवळपास तीन किलोमीटर चालून आल्यावर हेमंत टॉकीज लागले. चित्रपटांची अत्यंत उघड पोस्टर्स पाहून सुधाला कसेतरीच झाले. तिकिटाला रांग लागलेली होती. तेथेच तिला अंदाजाने बरगे आळी कुठे असावी हे समजले. एका आळीच्या तोंडाशी माणसांची प्रचंड ये-जा होती. सुधाला तिथे जातानाच भीती वाटू लागली. कित्येक माणसे तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागली. एकाने शिट्टी वाजवली. त्यात अनेक बायकाही होत्या. सगळ्यांच्या ओठांवर अत्यंत भडक व किळसवाण्या रंगाची लिपस्टिक होती. बहुतेक बायका पान खाऊन उभ्या होत्या. कपडे कधी एकदा काढतीय असे त्यांचे आविर्भाव अन कपडे होते. त्यात विशीपासून ते पंचेचाळीशीपर्यंत सगळे प्रकार होते. त्या बायका तर तिला पाहून चकीतच झाल्या होत्या. आळीच्या तोंडाशी असलेल्या हिम्मत बारपर्यंत सुधा पोचली. तिला आता प्रकर्षाने परत वळावे असे वाटत होते. पण निर्धाराने ती तिथेच तीन चार क्षण थांबली. तिला रेश्माचा पत्ता कुणाला विचारावा हे कळत नव्हते. बारच्या बाहेर तर्र झालेले दोन तरुण होते. त्यांच्या नजरा सुधाच्या अंगावर खिळलेल्या होत्या. त्यांची किळस आल्यामुळे सुधाने त्यांना काही विचारण्याचा विचार सोडून दिला. बारबाहेरच एक पानवाला होता. त्याच्या ठेल्यावर तसलेच लोक होते. पण आता पर्याय उरलेला नव्हता. सुधाने पानवाल्याला 'ये वही गली है क्या.. जो वोवाली औरतोंकी है' असा प्रश्न विचारल्यावर पानवाला गंभीर झाला तरी ठेल्यावरची गिऱ्हाईके थोडी खुसखुसली. पानवाल्याने नुसतीच होकारार्थी मान डोलावली. 'रेश्मा किधर रहती है' हा प्रश्न विचारल्यावर पानवाल्याला साधारण अंदाज आला की ही स्त्री बहुधा आपल्या नवऱ्याला खडसवायला आलेली असणार. त्याच्या हयातीत त्याने अशी दोन, तीन उदाहरणे पाहिलेली होती. त्याने फक्त हाताने दिशा दाखवून सुधाला टाळले. सुधा त्या दिशेने जायला लागली. ती दिशा सरळ सरळ त्या गल्लीच्या आतच जाणारी दिशा होती. गल्लीच्या तोंडाशी आल्यावर सुधाने सरळ मान खाली घातली. तेथील बायकांमधील एक तिला पाहून खूप जोरात हसली. दुसरीने लांबवर असलेल्या तिच्या एका दलालाला हाक मारून जोरात सांगीतले की 'देख नया माल आया है'! सुधाला अत्यंत यातना झाल्या. ती चार पावले पुढे गेली तोच दोन बायकांनी तिला घेरले. 'ए, कौन है तू? इधर कायको आयी? ' असे विचारत त्या हसू लागल्या. अर्थातच त्यांना 'सुधा घरंदाज बाई आहे' हे एका क्षणातच समजले होते. सुधा त्यांच्या तावडीतून सुटून निघाली तोच चक्क एका माणसाने तिची वाट अडवली. 'आती क्या? ' या प्रश्नावर सुधाला तर रडूच यायला लागले. पण हा एरियाच तसा होता. तिने त्या माणसाला टाळून जायचा प्रयत्न करताच त्या माणसाने तिला जोरात खेचले. सगळ्या बायका हसू लागल्या. 'दादा, इसकी सुहागरात तूमही करो, साली भाव बहुत खाती है रंडी' असे एक बाई त्या माणसाला म्हणाली. सुधाने आता मात्र धीर एकवटला. तिने त्या माणसाला विचारले. 'घरकी औरत है समझते नही क्या? छोडॉ' तो माणूस हसायला लागला. 'घरकी औरत इधर कायको आयेगी? ' त्याच्या अत्यंत निरागस प्रश्नावर सुधाच्या डोळ्यात पाणी जमा झाले. तेवढ्यात कुठलीतरी एक म्हातारी वेश्या आली अन तिने त्या माणसाला जायला सांगीतले. 'तुम कहती इसलिये छोडता इसको मॉ' ती बाई त्या माणसाची आई होती हे पाहून सुधाला तीव्र धक्का बसला. सुधाने हताश होत त्या बाईला विचारले. 'रेश्मा किधर रहती है? ' ती बाई म्हणाली 'कायको जाना तेरेकू उधर? ' ' मेरे पती उसके पास है, मेरा बच्चा हॉस्पीटलमे है, उसके खर्चेके लिये मैने अपना नेकलेस बेचनेकेलिये बाहर निकालके रख्खा था, वो नेकलेस उन्होने चुराया है, बच्चा बीमार है' हे वाक्य फक्त त्या म्हातारीलाच नाहीतर इतर बायकांनाही ऐकू गेले. त्यावरही त्यांच्यातील एक तरुण मुलगी खदाखदा हसत म्हणाली, 'तुम नही संभालसकती मर्दको तो वो क्या करेगा? ' हे वाक्य ऐकून दुसऱ्या एका बाईने त्या मुलीच्या सणसणीत थोबाडात हाणली. सगळ्याच वेश्या सुधापाशी जमा झाल्या. 'ए बाई, चल मै तेरेकू रेश्माके पास ले जाती, साले ये हरामी मर्द अपना घरबार नही देखते, इधर आते है -----को' असे म्हणून एका वेश्येने सुधाच्या दंडाला पकडून सरळ पुढे नेले. सुधाला आश्चर्यच वाटले. याही बायकांमध्ये एवढी इमानदारी?

त्या गल्लीतून त्या वेश्येबरोबर चालताना सुधाला नरक बरा असे वाटले. प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष, तिच्याचकडे पाहात होती. तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. निलेशची आठवण काढून ती धीर धरत होती. एका विशिष्ट तीनमजली घरापाशी आल्यावर ती बाई थांबली. 'तू यहॉसे उपर जा, दुसरे मंझिलपे रहती वो, लेकीन उससे झगडा मत कर, वो बहुत हरामी रंडी है, ठीकसे बात कर' या विधानातील 'झगडा मत कर' या भागाने तर सुधाचा धीरच खचला. त्यात आणखीन बाब्या तिथेच असणार अन आपल्याला पाहून मारतो की काय या चिंतेने तिला ग्रासले. ती कशीबशी जिना चढू लागली. एका वेश्येने तिला 'तू नयी आयी क्या? कौन लाया?' हे त्या दाटीवाटीच्या जिन्यातच विचारले. 'रेश्मा' एवढेच म्हणू शकली सुधा! सगळ्या मुली खदाखदा हसायला लागल्या. 'तू औरत होके औरतके साथ सोयेगी? तो मेरे साथ चल ना' या वाक्यानंतर ती सुधाला खेचायला लागली. सुधाने चलाखीने कशीतरी सुटका करून घेत जिना चढायचा वेग वाढवला तेव्हा त्या सगळ्या तिच्या घाबरण्याला हसत होत्या.

सुधाला जिन्यात किमान डझनभर वेश्यांना पार करावे लागले. कुणी हसत होते तर कुणी नुसतेच उत्सुकतेने पाहात होते.

वरच्या मजल्यावर आल्यावर एक दलाल तिला दिसला. दलालाला वर्षानुवर्षे फक्त स्त्री म्हणजे धंदा करणारी एवढेच माहीत होते. त्याने निरखून तिच्याकडे पाहिले. ' क्या चाहिये? ' ती एक घरंदाज बाई वाटत आहे हे लक्षात आल्यावर त्याने विचारले. 'रेश्मा? ' असे म्हणून सुधाने त्याच्याकडे पाहिले. त्याने नुसतीच आतल्या बाजूने मान हालवली. सुधा आत गेली. आत पलंगावर एक जाडजुड प्रौढ बाई लवंडलेली होती. ती टी. व्ही पाहात होती. तिच्या आजूबाजूला अनेक मुली टी. व्ही पाहात होत्या. त्यातल्या एकीचे सुधाकडे लक्ष गेले. तिने त्या - त्या प्रौढेला बहुतेक मौसी म्हणत असावेत- बाईला 'मौसी ये देख कौन आयी' असे सांगीतले.

मौसीने सुधाला पाहिले. मौसी कित्येक दशके तेथे मुरलेली बाई होती. अगदी पोलिसांना हप्ते देण्यापासुन, नवीन पळवलेल्या मुलींना पुन्हा कोठडीतून सोडवण्यापासून ते त्यांना पकडणाऱ्या पोलिसांना तिथेच फुकट शरीरसुख उपभोगायला परवानगी देण्यापर्यंत तिची मजल केव्हाच गेलेली होती. मौसीच्या अनुभवी नजरेने एका क्षणात ओळखले की हा प्रकार वेगळा आहे. तिने सुधाला 'कौन चाहिये' असे विचारले. सुधाने 'रेश्मा' म्हणताच 'कायको' असे विचारले. सुधाला तेथील रिवाज माहीत असणे शक्यच नव्हते. तिने खरा तो प्रकार सांगीतला. मौसीला समजले की एक चांगला नेकलेस कोठ्यावर पोचलेला असताना तो असा सहजासहजी जाऊ देणे म्हणजे वेडेपणाच आहे. तिने 'इथे कुणीही बाबू वगैरे नाही' म्हणून 'चल निघ' म्हणून सांगीतले. त्यावर सुधा 'मला रेश्माला फक्त भेटायचे आहे' असे म्हणाली. 'कायको? तेरा क्या संबंध इधर आके उससे मिलनेका? ' असा मौसीचा प्रश्न आल्यावर ती गांगरली.

आता काय करावे या विचारात असतानाच एक विचित्र प्रकार घडला. मागच्या कुठल्यातरी एका खोलीतून एक जवळपास नग्न असलेली साधारण पस्तीशीची बाई अंगावर कशीबशी एक साडी ओढून बाहेर आली अन एका मुलीला म्हणाली 'ए, तेरेकू बुला रहा है अब.. जा' एवढे म्हणून ती दुसऱ्या एका खोलीत गेली, बहुधा ती त्या सगळ्यांची एक कॉमन रूम असावी, कारण तेथे काही मुलींची ये - जा होती.

जिला ती 'तेरेकू बुला राहा है' म्हणाली तिने अजाणतेपणी आतून आलेल्या बाईला हाक मारली.. 'ए रेश्मा.. ये तेरेकू मिलनेकू आयी देख' यावर तिला मौसीने खाडकन एक लगावली. पण रेश्माला तोपर्यंत कळलेले होते की ही बाई आपल्याला भेटायला आली आहे. मौसी 'तू अंदर जा' म्हणत असतानाही रेश्मा तशीच तिला भेटायला आली. तिच्याकडे पाहून सुधाला प्रचंड धक्का बसला. एक तर धड तिच्या अंगावर कपडे नव्हते, त्यात तिचे शरीर तर सुधाहूनही बेढब होते. मौसी विरोध करत असताना रेश्माने मौसीलाच सुनावले. 'मेरेकू कोई मिल नही सकता क्या? ज्यादा बोल मत, मै सब बोलदुंगी वाघमारे साब को' सब-इन्स्पेक्टर वाघमारे यांचे आठवड्यातून किमान दोनवेळा रेश्माशिवाय पान हलत नव्हते. पण ते तिथे यायचे नाहीत, तिला बाहेर घेऊन जायचे.
ते सध्या विद्यमान अधिकारी असल्यामुळे त्यांची देखभाल करणे मौसीला क्रमप्राप्त होते. तिने त्यांना इतर अनेक तरुण शरीरांचे आमीष दाखवायचा प्रयत्न
केलेला होता, पण वाघमारेंच्या मते रेश्मासारखी सर्व्हिस मिळणे शक्यच नव्हते. मौसीचे काय काय चालते ते अनुभवी रेश्माला माहीत असल्यामुळे
सध्या कोठ्यावर मौसीच्या खालोखाल रेश्माच महत्त्वाची होती.

रेश्मा सरळ सुधाला कॉमन रूममध्ये घेऊन गेली. सुधाची मान अजून वर होत नव्हती. रेश्मा तिला 'शरमाती कायको, मै भी तेरे जैसी औरतही है ना? ' असे म्हणून तिच्याचसमोर अंग पुसून कपडे करायला लागली. 'हा, बता, कौन है तू? कायको आयी? ' रेश्मा म्हणाली.

सुधा - बाबू तुम्हारे पास आता है ना?
रेश्मा - कौन बाबू?
सुधा - मेरा घरवाला?
रेश्मा - अरे तेरा घरवाला कौन है लेकिन? मेरे पास दिनमे दो और रातमे तीन लोग आते है और छुट्टी के दिनके अलग!
सुधा - उसका नाम बाबू है, भुरी आँखे है, हमेशा पीला शर्ट पहनता है!
रेश्मा - उसका नाम तो विश्वास है ना?
सुधा - हां हां! वही! उनको घरमे सब बाबू कहते है!
रेश्मा - तो? उसका क्या?
सुधा - वो आया था क्या आज?

रेश्मा हसायला लागली.

रेश्मा - क्यू?
सुधा - मुझे अर्जंट मिलना था
रेश्मा - वो क्या अंदर पडा है दारू पीके! अभी कंचन को बुलाया है उसने!

सुधाला आणखीन एक धक्का बसला.

सुधा - उनको बुलाओ ना इधर
रेश्मा - धंदेके टाइमपे नही बुलाते हम लोग. और तू तो बडी डेंजर है? सीधा ये एरियामे चली आयी?
सुधा - काम अर्जंट है.
रेश्मा - बैठ इधरही, तेरा अर्जंट सब बादमे देख. अंदर भी अर्जंटही काम चलता है.

असे म्हणून ती जोरात हसायला लागली. सुधा चुळबुळत बसून होती. मधून मधून एखादी मुलगी येऊन जात होती. कुणी व्यवस्थित तर कुणी नुकतेच सगळे आटपून तशीच आलेली. सुधाला तो प्रकार असह्य होत होता. आपला नवरा इथे येतो? या रेश्मात आहे काय? आणि याला रोगबिग झाला तर? आपण तर आता संबंधच ठेवायचे नाहीत.

त्यात आणखीन एक मुलगी आली. ती तशीच एक गिऱ्हाईक आटपून आली होती. तिचा अन रेश्माचा संवाद झाला.

ती - ये राजूकातो आजकल ---ताही नही है ( हसायला लागली). फालतू टायम बरबाद! घंटाभर तय्यारी और आधे मिनिटमे खल्लास!

दोघी हसायला लागल्या. सुधाला ते संवाद ऐकून मळमळत होते.

जवळपास पंधरा मिनिटे झाल्यावर मगाशी मार खाल्लेली कंचन त्या रूममध्ये आली. रेश्मा सुधासमोर बसून होती. कंचनला सुधाबद्दल काहीच माहीत नव्हते.

कंचन - ये विश्वास तेरे साथ किया क्या?
रेश्मा - वो किधर कुछ करता है? टाईट होके आता है और गोदमे सो जाता है

पुन्हा दोघी हसायला लागल्या.

कंचन - लेकीन मेरेकूभी बुलाया आज उसने. (तिच्यामते विश्वास म्हणजे बाब्याने पार्टी बदलली याचा अर्थ ती आता रेश्माच्या तोलामोलाची होती. )

रेश्मा - अरे मै वैताग गयी थी, उसको बोला पटाका भेजती हूं. ये उसकी बीवी है देख!

कंचनला हा धक्काच बसला होता.

सुधा - वो आगये क्या बाहर?
रेश्मा - अरे वो तो कल उठेगा... अभी बहुत चढी है उसको... तेरेको देखना है तो चल!

रेश्माच्या पाठीमागून सुधा त्या नरकाच्या गाभ्यात निघाली. एका दारापाशी रेश्मा थांबली व तिने हाताने दिशा दाखवली. सुधाने आत पाहिले.

सुधाला इतकी किळस कधी आलेली नव्हती. चार बाय सातच्या अंधाऱ्या खोलीला नुसते लाकडी पार्टिशन होते. लाईट लागला आहे हे दिसावे एवढाच लाईट होता. एका बाजूला हुमा खानचे उत्तेजक पोस्टर होते. एकीकडे पाण्याचा माठ! सिगारेटचा धूर कोंडलेला. कुठल्यातरी स्वस्त दारूची अर्धवट भरलेली निप पडलेली. अत्यंत ओंगळवाणा पलंग अन त्यावरची चादर! त्यावरच आधीच्या मुलीचे एक दोन कपडे पडलेले. एकच उशी, अभ्रा वगैरे नसलेली! एका ठिकाणी एक वापरलेला निरोध! वरच्या कोपऱ्यात एक शंकराची मूर्ती, आपल्या भक्तांचे कर्तृत्व निमूटपणे पाहणारी! आणि खाली त्या शंकराचा भक्त पलंगावर सर्व जाणीवांच्या पलीकडे गेलेला! अंगावर एकही कपडा नाही. तोंडातून दारूचा ओघळ वाहिलेला! सुधाला ते दृष्य पाहणे म्हणजे मनस्तापाचा कळस होता. त्यातच पार्टिशनच्या वरून पलीकडच्या 'राजवाड्यातील' एक राणी अर्धनग्नावस्थेत मुंडके वर घेऊन या खोलीकडे पाहात एकदम उच्चारली.. ' ए कंचन काँडोम है क्या गं? ' तिला इकडचे दृष्य ध्यानात यायच्या आधी तिचा प्रश्न संपलेला होता. इकडे काहीतरी वेगळेच घडत आहे हे पाहून ती पुन्हा आपल्या पार्टिशनमध्ये लपली.

सुधा मागे वळली. पटकन मगाचच्या रूममध्ये गेली. रेश्माही तिच्या पाठोपाठ आली.

सुधा - उनको जगाके भेजो नं इधर! मै नही जाउंगी वहा!
रेश्मा - ठैर, वो उठता है क्या देखती मै!

पाचच मिनिटात प्रचंड धक्का बसलेल्या अवस्थेत बाब्या तिथे पोचला. अजून त्याची पूर्ण उतरलेली नसली तरी बरीचशी कमी झालेली होती. आपली बायको इथे पोचेल याचा त्याने विचारच केलेला नव्हता.

बाब्या - काय गं? ऑ? तू इथे? लाज नाही का वाटत?
सुधा - लाज? लाज तुमच्यासाठी सोडली मी!

हा संवाद ऐकून कंचन व रेश्मा मिष्कीलपणे संवादात रस घ्यायला लागल्या.

बाब्याने सुधाला धरून उठवले अन बाहेरच्या दिशेने ढकलायला लागला.

बाब्या - उठ, हरामी, खानदानाची इज्जत घालवलीस, उठ, चल बाहेर?
सुधा - निलेश हॉस्पीटलमधे आहे, एकवीसशे रुपये हवे आहेत.
बाब्या - मी काय खिशात ठेवतो एवढे पैसे? आण त्याला घरी.
सुधा - तुम्ही माझा नेकलेस घेतलात की नाही ते सांगा... तो मला हवाय
बाब्या - अगं चल? कसला नेकलेस? स्वतःच हरवते गोष्टी .. मला बोलते
सुधा - मी नाही जाणार

इथपर्यंत मौसीसकट सगळ्या बायका तिथे जमा झाल्या होत्या.

बाब्या - तुझ्या---- चल हो बाहेर...

आता सुधाचा शेवटचा आधार संपला. तिने मदतीसाठी रेश्माकडे पाहिले.

सुधा - अहो, तुम्हाला दिलाय का नेकलेस यांनी?
रेश्मा - ए भवाने, कुठली कोण तू? ऑ? ही रांड आळी आहे. इथे नेकलेस बिकलेस नसतो.
सुधा - तुम्हालाच दिलेला असणार!अहो माझा मुलगा दवाखान्यात आहे, मला फक्त नेकलेस हवाय.
रेश्मा - ए.. पुन्हा नेकलेस म्हणलीस तर मुस्काड फोडीन

आता रेश्माही पालटली होती. 'तिच्याशी झगडा करायचा नाही' हा सल्ला ऐकूनही सुधाने केलाच होता. त्यात बाब्याचा अन रेश्माचा वाद झाला.

बाब्या - साली हीच रांड आहे म्हणून मला इथे यायला लागते रेश्मा, तुला माहितीय मी किती प्रामाणिक आहे ते.
रेश्मा - या भवानीला पाठव आधी घरी! आला प्रामाणिक! इथे राडा नकोय मला.
बाब्या - मी राडा करतोय का? मी इथे तुझ्यासाठी येतो, तुझ्यावर पैसा उधळतो अन तुला लाज नाय वाटत हे बोलताना?
रेश्मा - अरे चल्ल? माझ्यासाठी येतो. माझ्यासाठी अख्खी दुनिया येते इथे! तू कोण लागून गेला?
बाब्या - दुनिया येते? साली हरामी!

बाब्याने अपमान सहन न झाल्याने रेश्माला ढकलाढकली केली. ते पाहून सगळ्याच मुली भडकल्या. त्यांनी बाब्याला घेरले अन पायताणाने मारले. हा त्यांचा राग एकया बाब्यावरचा नसून एकंदरच स्त्रीला या परिस्थितीत टाकणाऱ्या पुरुषजमातीवरचा होता. बाब्याची आधीच दारू प्यायल्याने अवस्था वाईट होती. त्यात हा मार अन अपमान झाल्यावर तो एकदम शुद्धीत तर आलाच पण रागाने रेश्माच्या अंगावर धावला. मात्र यावेळेस तो तिच्यापर्यंत पोचू शकला नाही. अनेक मुलींनी त्याला मध्येच अडवले.

आता रेश्माच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शिव्या सुधाने कधी बाब्याकडूनही ऐकल्या नव्हत्या. तिला बाब्याची अवस्था पाहवेना. ती त्याला सावरायला गेली तशी बाब्याने तिला एक जोरदार थप्पड मारली. सुधा त्या जोराने भिंतीवर आदळली.

इतके झाल्यावर अनेक मुलींमधील चांगुलपणा जागा झाला. त्यांनी बाब्याला धरून भरपूर फटके लावले. तोपर्यंत रेश्मा तो नेकलेस घेऊन आली. तिने तो सुधाच्या हातात देऊन एका दलालाला तिला आळीच्या तोंडापर्यंत पोचवून रिक्षेत बसवायला सांगीतले. मात्र सुधाचा जीव बाब्यात अडकला होता. त्याला काही मुली सोडेनात. त्या बाब्याला वाघमारेंकडे द्यायचे म्हणत होत्या. कोठ्यावर येऊन मारामारी केली म्हणून! त्यात रेश्माची तक्रार म्हंटल्यावर तर बाब्याची काही खैर नव्हतीच! शेवटी सुधाने अश्रू गाळत रेश्माकडे याचना केली.

आज त्या मौसीच्या कोठ्यावर घरंदाज स्त्री अन खरे प्रेम म्हणजे काय हे सगळ्यांनाच समजले. सुधाकडे पाहून शेवटी बाब्याला सोडून देण्यात आले.

रिक्षेतून घरी जाईपर्यंत बाब्याची मान वर झाली नव्हती. घरातही त्याचे बोलणे संपलेलेच होते. जेव्हा चार दिवसांनी निलेश बरा होऊन घरी आला तेव्हा मात्र बाब्या ढसाढसा रडला.

सुधाच्या पत्नीत्वाचा विजय झाला, पण बऱ्याच यातनांच्या अंती!