शिक्षणाच्या आयचा घो ??

ईतका फालतू टाईटल चा पहिचाच सिनेमाच्या जाहीरात पाहिली...शिक्षणाच्या आयचा घो??

आमच्या कंपनीतला शेजारी बसणारा एक नॉन मराठी माणुस हेच गाणं गुणगुणत होता...अन मध्येच मला विचारले ईसका मतलब क्या है भाई ? मी प्रचंड गोंधळ आणि लज्जित झालो... मग त्याला सगळं समजावून सांगीतल... तो म्हणाला यार ऐसे मुविस तुम बनाते हो ऑर हमे बोलते हो...  आईचा घो... हे गाणे देखिल प्रदर्शित झाले होते... पेशवे/भोसल्यांच्या महाराष्ट्रात ही असली गाणी सिनेमे तयार होतात हे दुर्दैव आणि वर ते प्रदर्शित होतात बिना रोखटोक हे तर अजुनच बकवास !!

खरचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे... ही संस्कृती आपण जोपासणार आहोत का ? एवढ्या खालच्या थरावर गेलो आहोत आपण की आपली मराठीतली नाव संपली होती म्हणून शिव्यांच्या नावाने सिनेमे काढत आहोत ??

आज प्रत्येक शाळा-त्यातिल तरुण नेतृत्व आणि भावी पिढी आइचा घो....आईचा घो म्हणत म्हणत सिग्नल वरून फ़िरेल.. वडिल/शिक्षक किंवा ईतर कोणीही काही काम सांगीतले तर त्याला उत्तर हेच असेल -- "## च्या आईचा घो !"