थोड सुखावत!

मी ! मी आहे म्हणून जगतांना
माझं जगणं!, थोड सुखावत

माझाच मी, माझेच सर्व
चांगल्यातिल  अर्क
जे जे काय चांगले , ते माझे
आणि मी , मी माझाच!

सुखावत थोड, खरंच!
गोड शिरशिरी उभारून जात
करतो सर्व स्वतःसाठीच
कर्तव्याचे नाव देऊन तिथे

स्वतःलाच स्वतः  कुरवाळण्याचा
छंदच असतो प्रत्येकाला
स्वतःलाच स्वतः कुरवाळतांना
माझ्यातला मी सुखावून जातो.