नमस्कार लोकहो,
सांगण्यास अतिशय आनंद होतो की, आम्ही 'Wellness & Lifestyle Excellance Center' तर्फे इथे बेंगलोर मध्ये ग्लोबल सूर्य नमस्कार मॅरेथॉन घेत आहोत. ही मॅरेथॉन १६ जाने. ते ३१ जाने पर्यंत चालणार आहे.
जगभरातून कोणीही भाग घेउ शकतो. जो भाग घेणार आहे त्याने फक्त एक रजिष्ट्रेशन फॉर्म भरून पाठवायचा आहे.. आणि त्याने रोज किंवा एका आठवड्यात किती सूर्य नमस्कार घातलेत ते भरून पाठवायचे आहे..
कुणी किती सूर्यनमस्कार घालावे ह्यावर बंधन नाही.. प्रत्येकाने त्याला सोसेल इतकेच सूर्यनमस्कार घालावेत. मग रोज एकच घातला तरी चालेल.. ह्या मॅरेथॉन चा उद्देश फक्त लोकांना योगासन अथवा सूर्यनमस्कार करण्यास उस्फुर्त करण्याचा आहे.
जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर जरून सांगा.
अजुनही बरीच माहिती आहे.. जी मी मेलद्वार पाठवू शकते.
धन्यवाद