परवा एका हॉस्पिटल विजीटला गेले होते. तीन दिवसाचे गोड बाळ, त्याचे पालक चायनीज . माझ्या बरोबर माझी एक सहकारी होती तिला मी सांगत होते या लोकांची नावे इतकी सारखी असतात नेहमी माझा गोंधळ उडतो. या वेळी तीन चायनीज कुटुंबांच्या बरोबर काम आहे--कुठले मूल कुठल्या कुटुंबातले ---काही कळत नाही. तिने सोपा उपाय सांगितला --घरी गेल्यावर सगळे सॉसपॅन बाहेर काढ आणि एक एक करून टेबलवर आपट ---जो आवाज येईल तो यापैकी एका तरी आडनावाशी जुळता असेल! ( बहुतेक सगळी नावे अँग किंवा आँग अशाच तर आवाजाची असतात) पुढच्या वेळी गोंधळ असेल तर त्या सॉसपॅनचा आकार आणि आवाज आठव!
मी काही हा प्रयोग केला नाही-- डायनिंग टेबल काचेचा आहे म्हणून!
आज परत आणखी एका चायनीज कुटुंबात जावे लागले. समोरची बाई आपल्या प्रॉब्लेम्सचा पाढा वाचत होती. नवऱ्याबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल! रोजचेच ऐकावे लागते-- नावे बदलतात, पत्ते बदलतात -- गाऱ्हाणी तीच असे वाटूनही मी शांतपणे ऐकत होते-- मधेच भिंतीवर तिच्या नवऱ्याचा फोटो बघितला ---कशाला या बायका एवढे सहन करत राहतात असा विचार करत होते आणि सगळा प्रोफेशनल आउटलूक गळून पडला. घरातले सगळे सॉसपॅन्स दिसायला लागले आणि एकामागून एक त्याच्या तुळतुळीत टकल्यावर आपटायला लागले. काय छान आवाज येतायेत आणि अगदी त्यांच्या नावासारखा उच्चार आहे, असा विचार करत होते!
ऑफिसमध्ये गेल्यावर हा नवीन शोध मारीयाला सांगितला. तिची कॉशस प्रतिक्रिया - नशीब GSCC ने असे काही उपकरण नाही काढले की कामात असताना आपण काही असे काही अनइथिकल असे विचार/ कल्पनाविलास करआयला लागलो की, त्यांना वास येईल!
( GSCC ही ब्रिटन मधील आमच्या क्षेत्रात लायसेन्स रेगुलेट करणारी शासकीय संस्था - धर्म, वंश किंवा रंगावरून कसलाही भेदभाव न ठेवता प्रोफेशनल प्रॅक्टिस करणे हा या रेगुलेषणमधला एक महत्त्वाचा निकष)
मृदुलाचा लगेचच प्रश्न --अगं 'त्या' बाळाचे नाव नाही सांगितलेस..........
काल ते बाळ घरी आले. आज बघायला गेले होते, त्याचे नाव विचारले. त्याची आई म्हणाली की ती मंडारीन आहे आणि वडील केंतोनीस त्यामुळे तिच्या वडिलांनी जे नाव ठेवले ते बाळाच्या वडलांच्या भाषेत वेगळे आहे. मी तिला म्हणाले अगं नाव वेगळे असले तरी उच्चार एकच असेल न --तर नाही म्हणे!
एकच नाव पण तिच्या भाषेत ते जि किओइ (ji kioi) आणि त्याच्या भाषेत जु जे (ju jie) असे आहे. मग काय म्हणणार त्याला घरी--- दोन्ही नावे! ( तिने दोन्ही भाषांमध्ये लिहून दाखवले - छान डिझाइन होती- असेही म्हणू शकत नाही की मला 'ढ' कळला नाही)
एकच नाव पण तिच्या भाषेत ते जि किओइ (ji kioi) आणि त्याच्या भाषेत जु जे (ju jie) असे आहे. मग काय म्हणणार त्याला घरी--- दोन्ही नावे! ( तिने दोन्ही भाषांमध्ये लिहून दाखवले - छान डिझाइन होती- असेही म्हणू शकत नाही की मला 'ढ' कळला नाही)
मी रेकॉर्ड ला काय लिहू ---त्यासाठी आम्ही अजून एखादे इंग्लिश नाव ठेवू पण अजून नक्की नाही केले --आतासाठी बेबी ---अँग असेच लिही ! ( म्हणजे छोटा सॉसपॅन)