माझा सायकल प्रवास.... एक चित्तथरारक पर्वणी...

यांत्रिक युगातील सर्वप्रथम... म्हणजे वाहनांच्या उत्पत्तीमध्ये सायकल हीच अग्रस्थानी आहे! कोणताही माणूस हे नाकारूच शकत नाही की त्याने सायकल हे पहिले वाहन चालवले आहे... (किमान पुण्यातला... किंवा भारतातला... )

जन्माला आल्या आल्या... बाबागाडी... मग पहिल्या वाढदिवसाला वॉकर.... दुसऱ्या वेळी छोटी पुढे हॉर्न आणि पायडल असलेली सायकल... पाचव्या वेळी एका पायावरून चालवायची सायकल (पाय सायकल).. मग शाळेत जायला लागल्यावर स्ट्रिटकैट/बीसए/हिरो.. वगैरे चे त्यातले त्यात भारी मॉडेल शॉक ऍब्सॉर्बर्स वगैरे असलेले... त्यातून हायस्कूल मध्ये तर त्याला गिअर्स पण लावून घ्यायचे... उंच सिट (त्यासाठी सिट चा रॉड बदलायचा)... ८-१० गिअर्स... मस्त सीट... हैंडल वर शिंगे... असा सगळा रुबाब करून सायकल वरून निघायचे....   तसेच पुढे कॉलेजला... (आत्ता च्या मुलांना शाळेतच गाडी मिळते कदाचित... ) गाडी मिळाली तर ठीक.. पण किमान ११वी १२वी तरी बहुतेकवेळा सायकल झिंदाबाद'च असायची... मग तेव्हा ही जुनी जपलेली सायकल विकायला काढून नवीन/सेकंड हैंड रेसर सायकल... तिच ती... पातळ टायर्स... वजनाने हलकी... पुढील बार ला पाण्याची बाटली अडकवता येणारी आणि वाकडं हैंडल असलेली... रेसर सायकल.. कुठूनतरी मिळवायची. ं आणि आमीर खानच्या थाटात... भर चौकातून "यहां के हम सिकंदर"... म्हणत सायकल हाणत वाट्टेल तेवढं लांब जायची तयारी ठेवून घराबाहेर पडायचं...!!

कित्ती छान दिवस होते ना... आणि आज BPO/IT/ITES मध्ये काम करून करून साधं गल्लीत चालणं होत नाही... "वेळ नाही" हे सर्वात सोयीस्कर कारण...

माझ पण असच होत अगदी... परंतु गेले काही दिवस NIGHT SHIFT असल्यामुळे घरी जायला पहाट होते... आणि पोहोचल्यावर लगेच झोप येणे शक्यच नाही... म्हणून TV लावतो... तर तिथे सगळे... फिटनेस मंत्रा... फूड & डाएट... योगा... ऐब्स... मेडिटेशन हे असले प्रोग्रॅम्स चालू असतात... आधी आधी मजा म्हणून बघायचो पण आता खरंच वाटायला लागलं होत की ह्यातली किमान एक गोष्ट तरी केली पाहिजे...

१) योगा - जमत नाही.. कारण इकडून तिकडे हात पाय लांब करून परत जवळ आणताच येत नाहीत..

२) मेडिटेशन - अहो एवढं चित्त स्थिर असतं... तर अजून काय पाहिजे?

३)  फूड & डाएट - जिभेवर ताबा नाहीये हो...

त्यामुळे सर्वात सोपा वाटणारा उपाय तर तो सायकलींग... झालं ठरलं... उद्यापासून सकाळी सायकलींग ला जायच... पण त्यासाठी सायकल तर हवी... जुनी माळ्यावर पडलेली सायकल पाहिली तर ती एवढी मृतावस्थेत होती की तिचा जिर्णोद्धार नवीन सायकल च्या तोडिस तोड झाला असता...

त्यामुळे नवीन सायकल घेतली... हीरो हॉक नावाची रेसर सायकल... (अजुनही आमिर खानचं "जो जीता" भुत डोक्यात आहेच बरं का... ) १० वर्षापूर्वी पुण्यातच माझ्या सायकल प्रवासाचा शेवट झाला होता... तेव्हा वाटलं होत की आता आपण कुठले परत ह्या दुचाकी वर बसतोय..!

पण नव्या जोमाने सायकल हाणायला घेतली.... दुकानापासून घरापर्यंत सायकल चालवत आणली... (येईपर्यंत जिव तोंडात न दात घशात गेले... ) रोज सायकल म्हणजे कठिणच काम वाटायला लागलं पण पहिल्याच दिवशी कच खाउन चालणार नव्हती... (कारण, घरचे म्हणत होते तुला जमणार नाही... रोज चालत जा हव तरं... उगिच "वायफळ" खर्च... नव्याचे नऊ दिवस..  Etc etc etc...  )

पण.... ठरवलं... किमान रोज ५ की. मी सायकल चालवायची... नाहिच तर निदान वीकएंडस तरी सायकल्वरून घालवायचे...

झाल.. शनीवार पहाट ( NDA road ला सायकलवरून जाऊन आलो... जिव थकला अगदी परंतु तेथे येणार्या लोकांन्न काहीच वाटले नसेल.. "तू काय शो करतोय्स...? असे शेकडो लोक येतात आजकाल फैड'च आहे... वगैरे आविर्भाव सहन करत तिथून सटकलो...

मग घरी जाउन १० च्या आसपास डेक्कन वर निघलो.. जाताना सिग्नल वर आजोबा लोक (जे गाड्यांवर होते) ते असे पाहत होते की जणू त्यांह्या तरुणपणात ते सायकल डोक्यावर घेउन रस्त्यावरून पळत जात असत...!  पुन्हा तीच नजर... मग ते झेलत झेलत पुढे गेलो... डेक्कन च्या चौकातून खाली जाणार होतो पण एका रिक्षावाल्याने अत्यंत हिडिसपणे सांगितले.. "अरे काय रे..   जा की पटापट पुढे... मध्ये मध्ये काय कर्तो.. जा की सरळ संभाजी पुलावरून... सायकल च काय करत न्हाईत हे बगळे... सायकल ला काय फाईन मारणार न काय जप्त करणार... चल निघ पटकन... "!   आता तेन्व्हांच मनात आले होते.. की आज मी माझी बाईक ओफ द ईयर सुझुकी GS150 घरी थेवून आलोय... नाहितर किती पटकन  निघून जाता येत ते दाखवल असतं... (अगदी ठिणग्या घासत... )

मग तसाच पुढे गेलो...   मित्रांच्या मंडळात पोचलो तेंव्हा त्यांन्नी अक्शरशः अख्खा  चॉक डोक्यावर घेतला.. कोणी म्हणाले.. शनीवारवाड्यावर सत्कार करा,.. कोण ओरडले शाल-श्री फळ आणा... कोणी कोणी तर साष्टांग नमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक केले...   सर्कसमध्ये जोकर ची एंट्री झाली की जे होत ना... तेच थोडक्यांत...!   खरं तर नवीन सायकल लगेच सर्वांन्नी चालवून पाहिली... पण एक लेकाचा टिंगल करणे थांबवेल तर शप्पथ...

मग तिथून आमचा मोर्चा निघाला नदिकाठून... सगळे गाड्यांवर आणि मी त्याच्यामध्ये सायकलवर... राहुल गांधी-राज ठाकरे-बाळासाहेब-ए. पी. जे. ह्यांच्या ताफ्त्याप्रमाणेच माझ्या भोवती गाड्यांचा ताफा करून चालले होते... मला एकदम VIP  झाल्याची Feeling... आली... :) तेवढ्यातच मला दिवसभराचा मानापमान विसरून आपण खुप खास काम केल्याचा आनंद झाला...  मग तिथून थोडावेळ भटकंती करून घरी यायला निघालो... वाटेत परत सिग्नल लागला.. ह्या वेळी ३-४ शाळकरी मुले माझ्या सायकल कडे कुतुहलाने पाहत होते... (त्यांच्या सायकलींपेक्शा थोडी भारी वाटली माझी सायकल)... शेजारीच एक म्हातारे गृहस्थ उभे होते.. त्यांची काळी (जुनी आजोबा ट्रेंडसेटर) सायकल हातात घेउन... बहुदा दमल्यामुळे त्यांना सायकल हातात घेउन चालावे लागले... (सिग्नल वर येतानाच ते सायकल हातात घेउन आले... ) त्यांनी माझ्याकडे पाहत विचारले -" कितीला पडली रे मुला हि नवीन सायकल? " - ३. ५ हजार.  

"देवा रे.... आमच्या वेळी मी हीच सायकल ३०० रुपयांना घेतली होती... आमच्या साहेबांनी दिले होते ५० रुपये आगाऊ म्हणून.... पण छान दिसतिये... रोज चालवतोस का? " -- हो आजोबा.. म्हणजे ठरवलं आहे.. बघू कसे जमते ते.

"उत्तम आहे... ते पर्यावरण, पेट्रोल ची बचत वगैरे सगळं ठिक आहे पण.. स्वतःच्या तब्येतीला सायकल चांगली असते. सर्वांगसुंदर व्यायाम आहे बर हा... तुमच्या जिम/बिम पेक्षा भारी... " - हो ना... नक्किच (कपाळावरचा घाम पुसत.. आणि लांब श्वास घेत)!

"-- माझी गाडी आज बंद पडलीये.. तशी मि सायकल चालवतोच रोज एकदा.. पण आत्त खरं एका स्नेहींकडे जायच होत म्हटलं पटकन जाउन यावं तर गाडीने बंद पुकारला..  आता मुलगा येईल संध्याकाळी तो करून आणेल नीट... "-- तुमच कॉतुक आहे आजोबा.. खरं तर सायकल म्हणजे...

पींग्ग.. पिंग्ग... पी.. पीई.... " मागचे हॉर्न वाजले आणि आम्ही आमच्या त्या कालबाह्य दुचाक्या पुढे दामटल्या...! आमचे संभाषण खुंटण्यास कारणीभुत टेंपोकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून मी सायकल कडेला घेतली... न तसाच आजोबांचा निरोप घेण्यासाठी हात वर केला... त्यांनीदेखिल आत्मियतेने नीट चालवा (लोकांच्या अंगावर घालू नका.. ) असे सांगून निरोप कबुल केला...

घराकडे येता येता गल्लीत आलो तर २-३ शाळेतल्या मित्रांची वाहने दिसली... (ऑर्कुट्वर फोटो पाहिले वाटत ह्यांनी सायकल चे)... जरा दबकतच घरात गेलो (सायकल घेउन- नवीन आहे ना.. आणि वजन १० किलो सुद्धा नाही... म्हणून घरातच ठेवतो... ) तर हे सगळे सायकल ची चॉकशी करायला आले होते... "व्वा... भारी आहे रे... मस्त'च एक्दम... साल्या फुकट पेट्रोल वाया घालवायचास ते तरी कमी होईल... अरे बुटकी वाटतिये पण, तुज्यासाठी ऊंटच आहे ही... सामान आहे एकदम, उद्या सकाळी घरी घेऊन ये रे... बास्स राव... नेक्स्ट वीक मला पाहिजे एक दिवस... "

असे एक ना अनेक उद्गार एकदमच बाहेर निघाले... आणि मग त्याच उद्गारांचे संदर्भासहीत स्पष्टिकरण करत करत, चहा... क्रिमरोल.. बाबांनी आणलेले सामोसे ह्यावर ताव मारत माझा वीकेंड संपला...

आता पाहू पुढे काय होते....!! (समजा ह्यातला एखादा अति-उत्साही मित्र सायकल खरचं घेउन गेला एक दिवस तर त्याला लिहायला सांगेन.. नाहीतर पुढचे अनुभव मीच लिहेन.. अर्थात ह्या लेखाचे प्रतिसाद संख्या पाहुनच बर का! )