माझा सायकल प्रवास.... एक चित्तथरारक पर्वणी.. भाग २

भाग एक वरून पुढे चालू - दुवा क्र. १
--
हुश्श... ! सुदैवाने... मित्रमंडळींपैकी कोणीही सायकल (चोरुन) घेउन गेले नाही... आणी हा आठवडयात देखिल मलाच लेखन भाग्य लाभले
तर मागे उल्लेखल्याप्रमाणे, आठवडाभर व्यवस्थित सायकल चालवली गेली... आमच्या वरून इन्स्पिरेशन घेउन आमचे तिर्थरुप देखिल सायकल दुरुस्त करून आले आणि रोज दुध आणायला सायकल वरून जात आहेत गेले २ दिवस. ( हो तीच ती मरणोन्मुख सायकल... खरं तर ईन्स्पिरेशन वगैरे विसरा पण, "जुनी सायकल छान'च होती, दुरुस्ती खर्च केवळ ७०० रु. - पण युवराजांना सगळं नवीन हवं" हे पटवून द्यायचे होते..पुणेरी शालजोडीतून ह्यालाचं म्हणतातं बर कां !) गेले २ दिवस लोक आमच्याकडे असे काही पाहू लागले आहेत की, 
१) आम्ही आणि आमची आधीची पिढि मिळून सायकलींचे दुकान काढणार आहोत,
२) किंवा पुणे सायकल प्रतिष्ठान च्या अध्यक्षपदी वडिलांची किंवा आमची निवडणुक झाली आहे...
३) किंवा मग आमची आर्थिक परिस्थिती अचानक प्रचंड खालावली आहे...(नजरा सांगत असल्या तरी त्यात संशय असतो कारण हे थोडस पचायला जड आहे कारण,मी लीवाईस जीन्स, ID चे बुट अजुनही सोडलेले नाहित..   आणि बाबा तर सफारी सोडून काही वापरतच नाहीत...)
शेजारी तर खुष झाले होते की आता रात्री बेरात्री हे कार्ट हॉर्न तर वाजवत घरी येणार नाही... (तसाही लेन मध्ये अंधार असल्याने मी हॉर्न टाकतो)पण त्यांना मी मोटार-सायकलही वापरात ठेवणार आहे हे त्याच रात्री समजलं...हा हा हा त्याचं काय आहे ना माणसाने आशा ठेवावी, अपेक्षा नाही( सध्या एका मैत्रीणीकडून ऐकलय हे वाक्य.. हे हे हे !)
सकाळी सायकल-संध्याकाळी मोटार-सायकल असे करत आठवडा गेला... संमिश्र प्रतिक्रिया आणि काही ठिकाणी सत्कार समारंभ(कट्यावरझाला तसाच..) देखिल पार पडला.... आता सायकल ला देखिल वेग आला आहे, आणि जे अंतर पार करायला ४० मिनीटे लागायची ते३० मिनिटात पुर्ण होत...   (आता काही प्रमाणात सिग्नल,वन वे, चार चाकी फक्त, चे नियम लागू होत नाहीत, आणि "मामा" सुद्धाक्वचितच "समज" देऊन सोडून देतो..पण नेहमीच नाही बरं का) तर, अश्या वेगवान वेळी, मी शुक्रवारी पहाटॅ NDA Road ला गेलोहोतो...तेथे नेहमीप्रमाणेच अपमान आणि अवहेलना करणारे लोकांचे 'लुक्स' पाहून मी कर्ण भक्त झालो आहे, आणि त्यांच्या त्या"मूक" कॉमेंटस ऐकू येऊ नयेत म्हणून माझी कुंडल (हेडफोन) कानात अडकवुन गाणी थोडी उंच आवाजातच ठेवतो...
तिथे जरा पुढे गेल्यावर मला एक ग्रुप भेटला, ५ मुले,२ मुली होत्या, आणि मुख्य म्हणजे सगळेच सायकल्स्वार,(माझी भारी सायकल देखिलमला भिकार वाटली त्यांच्यापुढे, बहुदा रेस वगैरे खेळत असावेत...किंवा पुण्यातले "लाईफ सायकल्स" दुकानाचे मालक ह्यांचे देणेकरी असावेत)
ओळख झाल्यावर समजले, कि हे सगळे सायकलीस्ट आहेत... आणि त्यांच्या प्रैक्टिस सेशन च्या टाईमसेट मध्ये त्यांनी बहुमुल्य वेळ वायाघालवून माझ्याशी हस्तांदोलन वगैरे करून घेतले आहे, (हे असल आपल्याला नाही जमणार बुवा, ३ सेकंडात ५ पायडल मारणे वगैरे...हीअशी मती भ्रष्ट होण्यापेक्षा आपण बरं आपली गती बरी...!)
रोजचा पल्ला गाठून जरा उशीराच घरी आलो... इथे स्वागत समीती तयार - "नुकताच कॉलेजकुमार झालेला मावसभाऊ, मावशी आणि काका."
सायकलची जम'के तारिफ केल्यावर मयुरेशने बाँब टाकला... "अरे दादा सायकलचं काम झक्कास झालयं... तसाही तु जाड होतआहेस (ही आजकालची कार्टी  ईतकी आगाउ आणि निर्लज्ज आहेत की तोडावर बोलतात- आम्ही म्हणायचो "सध्या लोकं काय जाड होत आहेत नै") आणि ऐक ना रे,मी बाईक चालवायला शिकलोय...मला आठवडाभर देशील का क्लास ला ? म्हणजे मग त्यानंतर मला नवीन घेतील... "(अरे वा रे शहाण्या...म्हणजे तुझा खाटिकखाना उघडण्यासाठी माझ्या बकरीला बळी देणार... )
आमचे तिर्थरुप म्हणाले--- अरे बाबा त्याची गाडी तो खुप जपतो... मला सुद्धा देत नाही कधी कधी... (एवढं बोलून थांबाव ना! ) पण तुम्ही तसेएकाच वयोगटात आहात.. तुला देईलही सहज... जा एक राईड मारून दाखव नीट... -- (बाबा, का हो एवढे उदार मतवादी होता (मीसोडून ईतरांच्या बाबतीत)?)
तो आला, त्याने पाहिलं,त्याने चालवली...तो घेउन गेला ( झालं १ आठवड्यासाठी... शेजारी पुन्हा खुष ! )- ह्या उक्तीचा खरा अर्थ आज'चसमजला.... आज सुट्टी घेतली होती त्यामुळे निवांत झोपण्याचा प्लैन करून थोडी डुलकी मारली देखिल, पण शाळकरी जनांचा फोन आला,त्वरीत डेक्कन वर, गुडलक मध्ये  भेटणे,आणि मी गाडी नाही असे सांगितल्यावर अर्वाचिन-प्राचीन शब्द सुनावण्यात आले, वरून "सायकलघेतलीयेस ना ? ये की मग टांग मारुन... " हे देखील ऐकवले..!
मी कसाबसा बेड मधून उठलो, आणि निघालो...  जाता जाता शेकडो खड्डे माज्या मोटारसायकल च्या शॉक-अब्सॉर्बर्स ची आठवण करून देतहोते..(इथून पुढे जेंव्हा जेंव्हा  रस्त्यांबाबत आंदोलन होईल तेंव्हा मी नक्की भाग घेईन... किंबहुना सायकलस्वारांसाठी तरी रस्ते ही गोष्ट मुलभुत/पायाभूत सुविधांमध्ये सामविष्ट करावी असे पीटीशन द्यावे की काय हा विचार करतोय मी.)त्यात भर चॉकातून स्टाईल मारण्याच्या नादात, पाण्याची बाटलीदेखिल खाली पडून गळायला लागली  ! हे सायकल प्रकरण एकंदरितट्रैफिक मध्ये अवघड'च आहे-- म्हणजे सरळ सोट रस्ता असेल तर ठिक आहे पण, पुण्यातल्या सायकल ट्रैक वरून बाईकर्स जास्त जातात... (मीसुद्धा त्यातलाच)... 
सायकल वरून जाणे म्हणजे केवळ दिव्य नसुन, अवहेलना, चिडचिड,अपमान, आणि रस्ता सायकलींसाठी नसतोच असे उग्र रुप घेतलेल्यादिव्य-दृष्टीदात्यांचे मायाजाल पार करण्याची कसरत आहे हे पटले.
ईच्छितस्थळी पोचल्यावर तिथेच मित्रांच्या समोर आणि चहाच्या कपच्या साक्षीने मी, माझ्यासोबतच समस्त मित्रमंडळाला एक प्रतीज्ञा घ्यायला लावली...!
"सायकल माझी (चाकेरी वाहनांच्या बाबतीत) आद्य गुरू आहे... सर्व सायकलस्वार माझे बांधव आहेत,
  मला त्यांच्याबद्दल अपार आदर आहे... जरी मी आज गाडीवर असलो तरी मी सायकल चे दुखः जाणतो..
  त्यामुळे कोणाही सायकलस्वाराला त्रास होईल असे वर्तन मी करणार नाही... त्यांन्ना सायकल ट्रैक वर प्राधान्य देईन..
  सायकलस्वार आणि त्यांचे चालक-बांधव ह्यांचा मान राखण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन व इतरांना करण्यास प्रवृत्त करेन !!"
जाताना घेतलेले सारे अनुभवांचे रीपिट एक्स्पिरियंस घेत घरी पोचलो.... निदान पुढिल आठवड्यात असे आयत्या वेळी जायला गाडी परत घरी येईल ह्या आशेवर सायकल जागेवर लावली आणि, मोठा श्वास घेऊन हा भाग दोन लिहायलाबसलो होतो... झाले... ! दिवसभराचा थकवा आणि त्यानंतरचे सायकलस्वारांबद्दलचे हे रिअलायझेशन घेऊन आता झोपायला जाणार ... !
ता. क: - वाचन हलके फुलके असले तरी..प्रसिद्धीसाठी काहीतरी मेसेज असणे आवश्यक म्हणून हा उतारा.
लाईफ सायकल्स: - टिळक रोड,पुण्यातील सर्वात मोठ्ठे आणि तितकेच महागडे सायकलींचे दालन.
वाचन आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद... 
आशुतोश दीक्षित.