दंत-कथा (आधुनिक)

"रूट कॅनल करावं लागेल.... " असे डॉक्टरांन्नी म्हणताक्षणी----लाख्खो मुंग्यान्नी वारुळातून बाहेर पडून कडकडून चावा घ्यावा... किंवा १००-२०० कि. मी.   चालवलेली गाडीच्या गरम गरम सायलेंसर चा चटका पोटरीला बसावा...   किंवा फार कशाला...   साखर १०० रु, डाळी ३०० रु, दुध-५० रु झाले तर तुमच्या हृदयाला आणि मेंदुला कश्या वेदना होतील?   तश्या अनेक वेदनांच्या भीतीने मी अस्पषटपणे...   "आई ग... " म्हणूनत्या आडव्या (लक्झुरीअस वोल्वो मध्ये बसायला आणि झोपायला एकच सिट असते तश्या) खुरचीतून उठलो...  !!   

(~~फ्लॅशबॅक~~)

गेला आठवडाभर,   एक हात की बोर्ड वर आणि एक गालावर ठेवून काम करत होतो...   प्रत्येक मित्र म्हणत होता अरे..   जा जाउन तर ये डॉ.   कडे?   पुढचं पुढे बघू...   साल्या तुझ रडकं तोंड पाहून आमचा कामाचा ( कि कामच्या नावाखाली गुगल चैट, ऑर्कुटिंग, आणि फुकटची कॉफीपिण्याचा... ).. मुड जातो बघ...!!   

खरं तर ह्याच मित्रांचा आगाऊपणा म्हणा किंवा सहिष्णुता म्हणा...   माझ्या तोंडून "आई गं! " बाहेर पडले होते - कारण मंगळवारी मी दातदुखतोय असे सांगितल्यावर जो तो (आपल्या परिने इंटरनेट चा वापर करून) माझ्या दुखण्याचे डिसेक्शन करत होता..!   बुधवारी संध्याकाळ पर्यंतत्यांच्या प्रयतनांन्ना यश आले,   आणि टिम मधल्या २ मुली आणि ४ मुले त्यांच्या "शोधनिबंधांच्या" लिंक्स मला पाठवून माझ्या डेस्क वर येऊन बसले...  !

अरे ती लिंक ओपन कर - "हा बघ हा दात आहे ना..   ह्यामध्ये असलेली पल्प टिस्शू आणि नर्व ( दुखऱ्या नसेला कितीही सोज्वळ नाव दिलं तरी काय फरक पडतो हो? )

आता ते काय करणार,   हा तुझा दात - फोडणार वरून,   मग ही नर्व ओढून काढणार आणि मग फिलींग केल कि झालं.... ( अरे लेका,   ते ठिक आहे पण,   फोडणार ह्या शब्दवर शंका येत आहे--हा काय नारळ वाटला की काय? ).... एवढ्यात या ग्रुप मधली प्रीती किंचाळत(एरंडेल ची अख्खी बाटली प्यायल्यावर करतात तसे तोंड करून) म्हणाली - ईई...SS,   खुप खुप दुखतं बरं का... बाकीचं ठिक आहे सगळं पण, ते इंजेक्शन देताना जी काय आग आग होते... काही विचारू नकोस... माझ्या बहिणीचे केले होते लास्टईयर...! ~! -------हो ना खरचं... मी पण ऐकलयं(इतिः श्वेता)! ( आता इथे काही गरज नव्हती पण अतिशयोक्तिच्या बाबतीत एक मुलगी दुसरीला दुजोरा देणार नाही हे कसं शक्य आहे? )

काम कसबसं संपवून जड पावलाने, (आणि त्याहुनही जड जबड्याने) घरी आलो,   फोन बुक काढून डेंटिस्ट ला कॉल लावला...   आणि अपॉंटमेंट घेतली... दुसर्या दिवशी सहाजिकच ऑफिस ला दांडी मारून जाव लागणार होत,   तसचं केल... ( सकाळीच बॉस ला फोन... बरं वाटत नाहिये,   अपॉंटमेंट घेतलीये..Etc Etc Etc....   आणि १/२ तास कारण समजावून सांगितल्यावर - ब्रम्हदेवाने तथास्तू म्हणाव त्या स्टाईलने बॉस म्हणाला-- ओ. के,   डन!   एक काम कर ना मग...   तसेही तुझे अपरेझल बाकी आहे,   मी रवीवारी काम करणार'च आहे,   तु पण ये,   म्हणजे तुझी सुट्टी पण वाया जाणार नाहीआणी अप्रेझल सुद्धा पुर्ण करू...) हा बॉस नावाचा प्राणी कधीकधी सावकाराच्या वरताण हिशोबी होतो बरं का..!!

दवाखान्यात गेलो तो समोर १ आजजी अजोबा बसले होते.. उजवीकडे एक लहान मुलगी ८-१० वर्षाची रडकुंडिला आली होती(बापाचा जीव खातहोती) आणि डावीकडे एक ड्रायव्हर टाईप ईसम बसला होता... म्हणजे दवाखान्यात येताना देखिल त्याने तंबाखू सोडली नव्हती...!!

मी रिसेप्शनिस्ट ला सांगितल... ती बसा (जिथे जागा असेल तिथे !) म्हणाल्यावर - जागा शोधत होतो... वास्तविक तिथे एखादी अजून खुर्ची मावली असती पण ते म्हणे "इंटीरीअरला सूट होत नाही"!   शेवटी दरवज्याजवळचा कॉर्नर बरा म्हणून तसाच टेकून उभा होतो... आतून एक पेशंट बाहेर आला आणि आजोब-अज्ज्जी आत गेले...

त्या माणसाला विचारले - "अरे भाऊ, कस काय? दात काढला की रुट कैनल'? "

तर त्या माणसाने आधी डोक गच्च दाबून धरलं (स्वता:च) मग कसाबसा आवाज काढत म्हणाला... डॉ.च काय  घेउन बसला राव...   दातदुख्याला लागले कि कोन डॉ. न कोण देव!!   सगळं गप्प्प पणे सहन कराव लागतं" ---?? ( म्हणजे काय? सरळ उत्तर द्या की... अस बोलताय जस की माझ्यामुळेच दात दुखतोय तुमचा... )

माझी धडधड वाढली... तेवढ्यात आज्जी अजोबा बाहेर आले, आणि मला त्या ब्रदर'ने (सिस्टर नव्हती इथे.. ) आत बोलावले... ( बोकडाला खाटिकखान्यात नेताना खाटिकाच्या तोंडावर कसे अविर्भाव असतात ते खाटिकखान्यात न जाताही मला ह्यामाणसामुळे समजले...!XX! ) आत गेलो... डॉक्टरांनी छान स्माईल दिली... पण ते हास्य असे वाटत होते की "गब्बरसिंग कालियाला गोळी घालायच्या आधी हसत होता.. "!!

त्या (आराम) खुर्चीत आडवा झालो, डॉ. नि ३-४ वेळा टोकाला आरसा लावलेल्या चमच्याने निरिक्षण करून झाले... मग एक छोटी हातोडीसारखी काहीतरी वस्तुने दातावर सहन होणेबल- म्हणजे मी ओरडेपर्यंत.. दातावर आदळ-आपट केली...(आणि म्हणाले - "रूट कॅनल करावं लागेल"... (फ्लॅशबॅक समाप्त)

"रूट कॅनल..X-RAY.. फीलींग मटेरिअल.. क्राऊन सगळे करावे लागेल...   ह्या गोळ्या घे आणि ५ दिवसानंतरची अपाँटमेंट देतो....! "

-- बरं, मग तसाच घरी आलो... बॉस ला कॉल केला... (ह्या गोष्टीत पण त्याला अपडेट द्यावे लागतात... )  तो आठवडाभर "अब गोली खा... " वाला डायलॉग कानात घुमत होता... पाचव्या दिवसापर्यंत ठणका कमी झाला होता...    पण बाळंतपण बाकीच होतं.. म्हणूनच ११ वाजता पुन्हा क्लिनिक ला गेलो... तिथे प्रीतीच्या म्हणण्यानुसार... डॉ.   नि "ओठ हलका सोड" म्हणत एक स्टील चे इंजेक्शन शक्य तेवढ्या आत खुपसून भुलीचे औषध आतपर्यंत घातले... एक क्षण असे वाटले कि आता जबड्याच्या खालून इंजेक्शन बाहेर येते की काय?!

झाल... थांब एक ५-१० मिनिटं... भुल चढेस्तोवर... तोपर्यंत मी दुसरा पेशंट पाहतो...

डोळे बंद... हाताने गच्च खुर्ची पकडलेली... तोंडात देवाचे नाव... (खरे तर तोंडाचे फंक्शन होत आहे का नाही ते कळेनासे झाले होते.. त्यामुळे मनात देवाचे नाव... ) आणि येणाऱ्या संकटाची चाहुल घेत पडलो होतो तेवढ्यात तो ड्राईव्हर (अगदी २ सेकंदापुर्वी पर्यंत तंबाखू खाणारा... तोच तो... ओरडला.. )!

ड्राईव्हरः "आ SS SS... तोच तोच डॉ... तोच दात दुखतोय खुप... २-३ दिवस काय सुचेना झालयं  काहीही करा, पण सुटका करा... काढुनच टाका बेस्ट वे... डोक्याला (की तोंडाला)  तापच नको परत...! "

डॉः " बरं, आपण शक्यतो दात वाचवायचा प्रयत्न करू (*काढून टाकला तर नेक्स्ट विझिट ची फी बुडेल ना! ) कारण तुमचा ओरिजिनल दात तो ओरिजिनल...   बघुया... ३ दिवसाच्या गोळ्या देतो... सुज उतरेल... मग आपण X-ray काढून ठरवू काय करायचं ते... "

ड्राईव्हरः बरं... ठिके आता तुम्ही म्हणाल तसं.. पण मला वाटतयं... काढुनच टाकावा...

डॉ. : बघुया ना.... या तुम्ही ३ दिवसांनी... (मनातल्या मनात खर्चाचा आकडा imagine करत ड्राईव्हर गेला.. )

आणि त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला... आह!.. लिहिताना त्या क्षणाची आठवण झाली तरी त्रास होतोय... पुढची दंतकहाणी थोडा ब्रेक घेऊन लिहितो..... (पार्ट-२ मध्ये....   )