विचित्र कविता (?)संग्रह !!! सावध !

आज पुस्तकविक्री दुकानात जाणे झाले......व पाहता पाहता एका अतिशय विचित्र
कविता (?)संग्रहावर नजर पडली....

ज्याम ज्याम मज्या मज्या - मन्या जोशी.

हा काय प्रकार आहे ? तुम्ही परिचित आहात का वरील कृत्याशी ? मला तरी
त्याला कलाकृती, कविता म्हणवत नाही.....कुठल्याही जस्टिफिकेशननेही...!!

मी त्याचं ते कृत्य बघून एवढा अवाक झालो की.... सुन्न झालो....हीच धोक्याची घंटा आहे असं मला वाटंतं.....

मग मी जरा इंटरनेट्वर जाऊन अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न केला.... तर मला खालील वाक्य त्याच्या विकी पेजवर आढळले.... (आजकाल काय कशाचीही आणि कोणाचीही विकी पेजेस होतात ! )

"मन्या जोशी हा आजच्या सगळ्यात जास्त प्रायोगिक कवीपैंकी एक आहे. तो आज मराठी साहित्यात 'पोस्ट मॉडर्नीस्ट सेन्सीबिलीटीला' represent करतो - सचिन केतकर

मी एक अस्सल मराठी तरुण असूनही माझी असली ही sensibility कधीच नव्हती......स्पीक फॉर युवरसेल्फ मन्या जोशी !

निषेध !

सावध - असल्या कृतींचं नंतर काही स्वघोषित पुरोगामी साहित्यिक(?) समर्थन, कौतुक करण्याची दाट शक्यता आहे...

वेळीच ही थेरं थांबवली नाहीत तर - मुक्तछंदाच्या नावाखाली असली दलदल वाढेल ! 

लिहीणारा अक्षरशः मनोरुग्ण वाटावा असं हे पुस्तक आहे....... त्याला प्रकाशकाची नाही तर psychiatrist ची जास्त गरज आहे असं वाटंत !

एक तर रचना अशी आहे की - काव काव, काव काव, कर्कश, काव काव, फाट आवाज.... असं काहीतरी !!!

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच की ! मी मान्य करतो..... अरे पण म्हणून काय ही अशी घाण करायची ?

मला ह्या व्यक्तीला पुढील प्रश्न विचारावेसे वाटतात -

१. मराठीवर हा असा सूड घेण्यासाठीच का तू  एम. ए (मराठी) केलंस का बाबा ?

२. तू नक्की कोणाला represent करतो आहेस ? एमए करून व US ला उच्च शिक्षण घेऊन, येथील चंगळवादी ad agencies मध्ये वस्तू विकणाऱ्या तुझ्यासारख्याच तरुणांना ना ? तसंच असूदे बाबा !

३. अगम्य, अर्वाच्य, शिसारी आणणारं, ज्याचा संदर्भ फक्त तुलाच माहिती असेल असं, निरर्थक, हीन, सेडिस्ट, हिडीस, आणि पराकोटीचं विकृत असं लिहून तू काय साध्य केलंस ?

४. तुझ्या मनातली विकृती, अश्लीलता, नीचता, बीभत्सता तुला जाहिरपणे मांडताना त्याच्या योग्यायोग्यतेचा काहीच विचार करावासा वाटला नाही का रे ? (म्हणजे 'माझ्या मते ह्या माझ्या रचना कितीही उच्च दर्जाच्या व अभिरुचीसंपन्न असल्या तरी लोकांसमोर मांडणे योग्य आहे का ?')

Pretentious, mediocre, hypocrite ह्या शब्दांना लाज वाटावी असे हे कृत्य आहे ! 
'मनःस्वास्थ्यातून विकृतीकडे' - अशी या माणसाची आइडियोलॉजी दिसते !

परत कर ती एमए ची पदवी मुंबई विद्यापिठाला ! आणि काय उच्छाद मांडायचा आहे तो तुझ्या ad agency तल्या अमराठी, चंगळवादी, अमेरिकनाईस्ड fellow कॉपीराईटर्स पुढे मांड !

मी येथील मराठी मित्रांना आवाहन करू इच्छितो की जमलं तर आणि संधी मिळाली तर ह्या माणसाला civil, सभ्य पण परखड निषेध करायला विसरू नका !